कोकण व विदर्भात अतिवृष्टीचा इशारा
मुंबई | मुंबईत पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून शुक्रवारी पहाटेपासून शहर आणि उपनगरांमध्ये संततधार पाऊस सुरू आहे. परळ, कुलाबा, वरळी, वांद्रे, अंधेरी यांसारख्या भागांमध्ये पावसाचा जोर अधिक जाणवत आहे.
हवामान विभागाने यापूर्वीच हलक्यापासून मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्याप्रमाणे शहरात सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली असून पुढील दोन-तीन दिवस पावसाची हीच स्थिती राहणार असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये पावसात खंड पडल्याने मुंबईकर चिंतेत होते. मात्र, आता पुन्हा पावसाची संततधार सुरू झाल्याने थोडं समाधानकारक वातावरण निर्माण झालं आहे. पावसामुळे तापमानात घसरण झाली असून वातावरणात गारवा जाणवतो आहे.
उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय
पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या किनाऱ्यांवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्याचा परिणाम म्हणून मान्सून पुन्हा सक्रिय झालेला आहे. गंगानगर, सिरसा, मिरज, पाटणा, जमशेदपूर, दिघा या भागांमध्येही हा प्रभाव जाणवत आहे. महाराष्ट्र ते केरळदरम्यानही एक कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
कोकण व विदर्भात अतिवृष्टीचा इशारा
हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार पुढील भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे:
कोकण – रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई
पश्चिम महाराष्ट्र – सातारा घाट परिसर, पुणे घाट परिसर, कोल्हापूर
विदर्भ – गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, अकोला, वाशिम, परभणी, बुलढाणा
या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
समुद्रात उंच लाटांची शक्यता, समुद्रकिनाऱ्यावर न जाण्याचा सल्ला
शुक्रवार आणि शनिवारी समुद्रात साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार असल्याची शक्यता असून, २६ जुलै रोजी सर्वात मोठी भरती होणार आहे. त्यावेळी लाटांची उंची ४.४० मीटर इतकी असू शकते.
मुंबई महापालिकेने नागरिकांना समुद्रकिनाऱ्यांवर जाणे टाळण्याचे आवाहन केले असून प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याची विनंती करण्यात आली आहे.
⛔ नागरिकांसाठी सूचना:
अनावश्यक प्रवास टाळा
समुद्रकिनाऱ्याजवळ न जाऊ नका
स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा