परभणी शहरातील वसमत रोडवरील शेटे बंधूंच्या तीन दुकानांच्या गोदामाला गुरुवारी (२४ जुलै) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. आगीने काही वेळातच गोदामाचा मोठा हिस्सा भस्मसात केला. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीत लाखोंचं नुकसान झाल्याची शक्यता असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक माहितीवरून समजते. आग लागण्याचे नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
