पुणे जिल्ह्यासाठी यलो अलर्ट, घाट परिसरात ऑरेंज अलर्ट
नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, प्रशासनाचा इशारा
पुणे |
पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल होत असून पुढील 24 तास पावसाचा जोर कायम राहणार आहे. विशेषतः पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांच्या घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर इतर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात उत्साहाचे वातावरण असतानाच, हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- Weather Alert: या जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता ; 24 जिल्ह्यांना अलर्ट
- Central Government Alert केंद्रा कडून ; सर्व राज्यांना पत्र 20 दिवसांत ॲक्शन प्लॅन तयार करण्याचे आदेश
- ZP Election जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर ; कोणत्या जिल्ह्याला कोणतं आरक्षण?
- Weight Lose सकाळी करा ही ५ कामे; पोटाची चरबी कमी होईल
- Nano Banana AI वापरून काही मिनिटांत 3D फोटो कसा बनवायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
पुणे जिल्हा
पुण्यात आज दिवसभर जोरदार पावसाची शक्यता असून संपूर्ण जिल्ह्यासाठी यलो अलर्ट तर घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 28 ऑगस्ट रोजी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
- Weather Alert: या जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता ; 24 जिल्ह्यांना अलर्ट
- Central Government Alert केंद्रा कडून ; सर्व राज्यांना पत्र 20 दिवसांत ॲक्शन प्लॅन तयार करण्याचे आदेश
- ZP Election जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर ; कोणत्या जिल्ह्याला कोणतं आरक्षण?
- Weight Lose सकाळी करा ही ५ कामे; पोटाची चरबी कमी होईल
- Nano Banana AI वापरून काही मिनिटांत 3D फोटो कसा बनवायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यासाठी स्वतंत्र इशारा नसला तरी सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूरच्या घाट परिसरात पुढील 24 तासांत जोरदार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. या भागासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर झाला असून उर्वरित जिल्ह्यात हलक्या ते मध्यम सरी बरसतील. हवामान खात्याने पुढील काही दिवस पावसाचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
सांगली व सोलापूर जिल्हा
या दोन जिल्ह्यांसाठी कोणताही विशेष अलर्ट देण्यात आलेला नाही. तथापि, ढगाळ हवामानासह हलक्या सरींचा अंदाज आहे.
नागरिकांना आवाहन
हवामान खात्याच्या सूचनेनुसार, घाटमाथ्यावरील भागात भूस्खलन, नद्यांचे पाणी वाढणे आणि वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, तसेच सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पुढील 24 तास पावसाचा जोर कायम राहणार आहे. पुण्यासह कोल्हापूर आणि सातारा घाट परिसरात हायअलर्ट घोषित करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहणे अत्यावश्यक आहे.