Beed Crime: अवैद्यरीत्या देशी दारू वाहतूक करणाऱ्या इसमावर माजलगाव पोलिसांची धडक कारवाई

Spread the love

₹55 हजारांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त

गोपनीय माहितीवरून पोलिसांचा सापळा

माजलगाव :
माजलगाव शहर पोलिसांना गोपनीय माहितीच्या मार्फत माहिती मिळाली होती की, सुरेश बाबुराव खंडागळे (रा. गोविंदवाडी, ता. माजलगाव, जि. बीड) हा इसम स्वतःच्या फायद्यासाठी विनापरवाना आणि बेकायदेशीर मार्गाने देशी दारूची वाहतूक करीत आहे. मिळालेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे पोलिसांनी नविन मोंडा परिसरात सापळा रचला.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी संशयिताची मोटारसायकल थांबवून त्याची झडती घेतली असता, त्याच्या ताब्यातील निळ्या रंगाच्या गोणीत ₹5,600 किमतीची देशी दारू असल्याचे आढळले. तसेच त्याच्या ताब्यातील ₹50,000 किमतीची मोटारसायकल देखील जप्त करण्यात आली. मिळून एकूण ₹55,600/- किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनित कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई श्रीमती चेतना तिडके व उपविभागीय पोलीस अधिकारी माजलगाव निरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या छाप्यात पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ, पोउपनि केरबा माकणे, पोह/अस्लम शेख, पोकॉ/1926 महेश चव्हाण, पोकों/1619 अंगद घोडके, पोकों/2222 सुनिल गवळी आणि पांकों/ज्ञानेश्वर पोकळे यांनी सहभाग घेतला.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध बेकायदेशीर दारू वाहतूक व विक्री याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *