पाच एकरांतील कापसात पाणी, उभा कापुस नासला

Spread the love

पंचनामे करून तात्काळ मदत द्या

शेतक-यांचा टाहो

माजलगाव :
माजलगाव शिवारातील तालुका कृषि अधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या गट नं. 179 मधील शेतकरी श्रीराम शेळके व मदन नावडकर या दोन शेतक-यांच्या पाच एकर उभ्या कापसात झालेल्या अतिवृष्टीने पाणीच पाणी झाले असुन उभा कापुस नासला आहे. त्यामुळे पंचनामे करून तात्काळ मदत द्या असा टाहो शेतकरी फोडत आहेत.

मागील सात दिवसांपुर्वी शहरासह तालुका परिसरात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टी सदृश्य पावसाने हैदोस घातला. अनेक गावातील नद्यांना पुर आला तर पुल वाहुन गेल्याच्या घटना देखील झाल्या. त्यामुळे तालुक्यात झालेल्या 59 हजार 364 हेक्टरवरील खरिप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. माजलगाव शिवारातील तालुका कृषि अधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या गट नं. 179 मधील शेतकरी श्रीराम शेळके यांचा अडीच एकर व मदन नावडकर यांच्या अडीच एकरवर बहारदार आलेल्या कापसाचे देखील या अतिवृष्टीने आतोनात नुकसान झाले आहे. गरीब शेतक-यांनी पेरणीसाठी पैशांची जमवा – जमव करत पेरणी केली. कापुस चांगला आला परंतु निसर्ग कोपुन झालेल्या अतिवृष्टीने उभ्या कापसांत सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने कापुस नासला आहे. त्यामुळे शेतक-यांच्या हाता – तोंडाशी आलेला घास या अतिवृष्टीने हिरावला असल्याने तात्काळ पंचनामे करून मदत द्या अशी मागणी शेतकरी शेतकरी श्रीराम शेळके व मदन नावडकर यांचेसह सर्वच शेतक-यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *