माजी नगर सेवकावर गुन्हे दाखल करावे – संदिपान (तात्या)हजारे.आर.पी.आय.बीड जिल्हा कार्याध्यक्ष

Spread the love

खा. बजरंग सोनवणे खंडणीखोर नगरसेवकाची तात्काळ पक्षातून अक्कलपट्टी करा-सुनील हिरवे

केज /

केज येथील सोशल मिडीया वर व्हायरल आडीओ क्लिप प्रकरणी केज रमाई नगर येथील गायरान प्रश्नी आर.पी. आय. पक्षाच्यावतीने पत्रकार परिषद आयोजीत केली होती संबंधीत पत्रकार परिषदेत बोलताना आर. पी. आय. पक्षाचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष संदीपान (तात्या ) हजारे यांनी स्वंय घोषीत नेता, माजी नगरसेवकावर गुन्हे दाखल करावे असे सांगितले.

केज शहरात दोन दिवसा पासून सोशल मिडीयावर व्हायरल ऑडीओ क्लिप मुळे खळबळ उडाली असून केज शहरातील रमाई नगर भागामध्ये शासकिय गायरान जमिनीवर दलीत समाजातील गोर गरीब, होतकरू अशा लोकांनी आपापली घरे तयार करून आपले वास्तव्य केले आहे, परंतु दलित समाजातील स्वंयघोषीत नेता, माजी नगरसेवक दलित समाजाची फसवणूक करत असून स्वतःच्या स्वर्थासाठी दलीत समाजाला वेठीस धरून फसवणूक करत असल्याचे संबधीत ऑडीओ क्लिप वरून निदर्शनास येत आहे.रमाई नगर केज येथील गायरान जमिनी प्रकरणी समाजाच्या नावाने दलाली करणाऱ्या तसेच समाजाच्या नावाने स्वतःची राजकिय पोळी भाजून स्वार्थ करु पाहणाऱ्या स्वंयघोषीत दलीत नेत्यावर, माजी नगरसेवका वर गुन्हे दाखल करावेत असे आरपीआय कडून आयोजीत पत्रकार परिषदेत बोलताना आरपीआय चे बीड जिल्हा कार्याध्यक्ष संदीपन तात्या हजारे यांनी सांगितले.
पुढे बोलताना आरपीआय चे केज तालुकाध्यक्ष, सुनिल हिरवे यांनी सांगितले कि, स्वंय घोषीत, दलित नेता, माजी नगरसेवक कपिल मस्के हा शरद पवार राष्ट्रवादी गटाचा कार्यकर्ता असून या गटाचे खासदार बजरंग साहेबांनी संबंधित, दलित समाजाच्या नावा खाली दलाली करून, समाजाला वेठीस धरून दलित समाजाची फसवणूक करणाऱ्या माजी नगर सेवकास, स्वंय घोषीत माजी नगरसेवकाची तात्काळ पक्षातून हाकलपट्टी करण्यात यावी अन्यथा पॅंथर स्टाईलने खासदार यांना सदर प्रकरणे जाब विचारला जाईल असा इशारा देखील हिरवे यांनी दिला आहे. आणि रमाई नगर केज येथील गोर गरीब, होतकरू दलित समाजास न्याय द्यावा, तसेच सामाजातील लोकांना त्या ठिकाणी घरकूल मंजूर करून घरे बांधून द्यावीत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तसेच अशा समाजाच्या नावाखाली दलाली करणाऱ्या माजी नगरसेवकास तात्काळ पक्षातून काढून टाकावे व दलित समाजाचा रोष टाळावा अन्यथा दलित समाजाच्या रोशाला खासदार सोनवणे यांना सामोरे जावा लागेल असे बोलताना हिरवे यांनी स्पष्ट केले आहे.रमाई नगर येथील गरीब, असहाय्य दलित समाजास खासदार, बजरंग बप्पा यांनी न्याय द्यावा अन्यथा परिणामी प्रकरणाला खासदार सोनवणे जबाबदार राहतील ‌ आरपीआय चे केज तालुकाध्यक्ष सुनिल हिरवे यांनी केली.
प्रसंगी दलित समाजासाठी संबंधीत स्वंयघोषीत दलित नेत्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी रस्त्यावर उतरून, मोठा लढा उभा केला जाईल, गरीब समाजाच्या झोळीतील खाणाऱ्यावर आरपीआयच्या माध्यमातून दलित समाजासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झुंजार पणे लढा देणार असल्याचे त्यांनी सांगीतले तसेच संबंधील दलाल असणाऱ्या स्वंय घोषीत दलीत नेता, माजी नगरसेवक कपिल मस्के याच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत आरपीआय च्या माध्यमातून दलित समाजासाठी लढा देवू असे त्यांनी सांगितले. तसेच आरपीआय च्या सर्व पदाधिकारी यांनी आपापल्या प्रतिक्रिया देवून दलित समाजाच्या अन्याया विरुद्ध एकजूटीने लढा देण्याचे सांगितले
यावेळी आरपीआय चे नवनाथ तपसे मराठा आघाडी रिपाईचे बीड जिल्हाध्यक्ष, महादेव ढवारे मराठा आघाडी रिपाईचे केज तालुकाध्यक्ष, सुरेश बचुटे रिपाईचे जेष्ट नेते, देवानंद वाघमारे रिपाईचे केज तालुका उपाध्यक्ष, अमोल मस्के रिपाईचे शहर प्रमुख, चंद्रकांत नाना मस्के रिपाईचे जेष्ठ नागरीक तसेच दिनकर मस्के यांसह रिपाईचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *