ईद-ए-मिलादुन्नबी जयंती समितीच्या अध्यक्षपदी सय्यद सलीमबापू

Spread the love

निवड समितीने तिसऱ्यांदा केली निवड

माजलगाव /

५ सप्टेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या ईद-ए-मिलादुन्नबी जयंतीनिमित्त

अहले सुन्नतवल जमाअत कमीटी
उत्सव समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते सय्यद सलीमबापू यांची निवड करण्यात आली आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली उत्सवाच्या तयारीस प्रारंभ झाला असून,जुलुस,धार्मिक व सामाजिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समिती सक्रिय झाली आहे.दरम्यान सलीमबापू यांच्या अध्यक्षतेखाली विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात येणार असून, त्यांची ही निवड समितीकडून तिसऱ्यांदा करण्यात आली आहे.

इस्लाम धर्माचे सर्वश्रेष्ठ हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती म्हणून ईद-ए-मिलाद साजरी केली जाते.
ह.मोहम्मद पैगंबर हे अल्लाहचे अंतिम प्रेषित होते.इस्लामच्या धारणेनुसार अल्लाहने त्यांच्या मार्फत कुराण हा धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवला.इस्लाम मध्ये ईद-ए-मिलाद हा सर्वात मोठा दिवस मानला जातो.हजरत मोहम्मद पैगंबर यांनी त्यांच्या आयुष्यात नेहेमीच शांततेचा संदेश दिला आहे.त्यांच्या या शिकवणीची आठवण त्यांनी दिलेल्या कुराणची शिकवण ही सर्वसामान्य नागरिकांच्या लक्षात राहावी आणि त्यांनी आपल्या जीवनात ती अमलात आणावी यासाठी ईद मिलादुन्नबी साजरी केली जाते. यानिमित्त शहरातील आझाद नगर भागात 17 ऑगस्ट रोजी बैठक पार पडली.यावेळी 5 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त
साजरी होणाऱ्या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी या भागातील ज्येष्ठ नेते सय्यद सलिमबापु यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.दरम्यान ईद ईद मिलादुन्नबी निमित्त शहरात जुलूस मिरवणूक काढण्यात येणार आहे.मज्जीद मध्ये धार्मिक प्रवचन करण्यात येणार आहे.मिठाई, सरबत वाटप केली जाणार आहे.
त्याचप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रमाची मेजवानी नागरिकांना अनुभवास मिळणार आहे.जशने मिलाद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन जयंती अध्यक्ष सय्यद सलिमबापु,सय्यद सिराजोद्दीन कादरी.सय्यद युसुफोदीन कादरी आगा खान साहब.शेख महेबुब. शेख मुस्तकीम.सय्यद रईसोद्दीन कादरी.मिर्झा महेमुद.शेख आसेफ भाऊ सय्यद रहीम फिटर.सय्यद समीर.सय्यद मुदस्सीर.शेख हारून फिटर.शेख अख्तर.शमशेर पठाण. सय्यद तौफिक.सय्यद अली खतीब आसेफ.शेख महेबुब.सय्यद शफिक भाऊ.शेख इलियास.शेख गुलाब. शेख चुन्नु. सय्यद तौफिक कादरी. सय्यद फारुख अण्णा तौफिक.सर्व अहले सुन्नतवल जमाअत कमीटी माजलगावकडुन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *