Mutual Funds Investment Marathi म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक कशी सुरुवात करायची

Spread the love

SIP मध्ये तुम्ही ५०० रुपयापासून गुंतवणूक करू शकता

कमी रकमेत योग्य परतावा

कर बचती साठी हि गुंतवणूक करा

आजच्या या योगामध्ये पैसे कमवण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी फक्त बँकेमध्ये ठेवून समाधान होत नाही त्यासाठी नवनवीन गुंतवणुकीचे पर्याय हे उपलब्ध आज होत आहेत ज्या प्रमाणामध्ये महागाईचा दर हा वाढत चाललेला आहे त्याच पद्धतीने पैशाची किंमत देखील कमी होत चाललेले आहे याच परिस्थितीमध्ये आपल्या पैशाला वाढवण्यासाठी गुंतवणुकीविषयी व आर्थिक उद्दिष्ट स्पष्ट असणं गरजेचं आहे त्यामध्ये Mutual Funds ही एक अशीच लोकप्रिय आणि सरळ आणि सोपी पद्धत आहे जे की सुरक्षित देखील आहे जो या गुंतवणुकीमध्ये कोणीही गुंतवणूक करू शकतो लहान असो मोठा असो लहान पैशापासून ते मोठ्या पैशांपर्यंत आपण या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणुकी करू शकतो

Mutual Funds बाबत आपण सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामध्ये प्रमुख म्हणजे Mutual Funds म्हणजे काय त्याचे प्रकार फायदे तोटे जोखीम आणि व्यवस्थापन व योग्य फळ निवडण्याचे काही खास टिप्स देखील या सविस्तर माहिती घेऊया

Mutual Funds नेमके काय असते

Mutual Funds म्हणजे लोकांच्या मार्फत गोळा केलेला पैसा हा जे की तज्ञ लोक फंड्स मॅनेजर्स विविध वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट शेअर्स किंवा इतर गुंतवणूक व इतर साधनांमध्ये गुंतवणूक ही करत असतात Mutual Funds Investment Marathi त्यामध्ये बघितले गेले तर तुम्ही आणि तुमचे मित्र मिळून प्रत्येकाने महिन्याला एक हजार रुपये दिले तर एकूण एक लाख रुपये हे जमा होतात आता हा पैसा सगळा वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स किंवा वर्ड्स मध्ये गुंतवणूक केली तर मिळालेला नफा सर्वांना आणि गुंतवणुकीच्या प्रमाणात वाटून देखील दिला जातो

Mutual Funds प्रकार


इक्विटी म्युच्युअल फंड

इक्विटी म्युचल फंड हे मुख्य म्हणजे शेअर बाजारामध्ये गुंतवणूक हे करत असतात ूक ही दीर्घकालीन वाढीसाठी सर्वाधिक उत्तम देखील मानले जाते ज्यामध्ये जोखीमही तुलनेने जास्त असते

डेब्ट म्युचल फंड

सर्वसामान्य माणसाला सर्वात सुरक्षित गुंतवणुकी मुख्यत्वे बघितले गेले तर बँक ही सर्वाधिक सेफ गुंतवणूक असे समजले जाते त्याच प्रमाणात बँक एफडी सारखे स्थिर उत्पन्न आहे देणारी गुंतवणूक आहे त्यामध्ये प्रमुख बघितले गेले तर सरकारी बॉण्ड्स कॉर्पोरेट डिबेनचर गुंतवणूक

हायब्रीड म्युच्युअल फंड

हायब्रीड म्युचल फंड या गुंतवणुकीमध्ये इक्विटी आणि डेफ्ट या दोघांचा मिळून एक पोर्टफोलिओ संतुलित आणि जोखीम हे स्थिरतावर असते

इंडेक्स फंड

इंडेक्स फंड जसे की शेअर बाजार त्यामध्ये निफ्टी फिफ्टी किंवा सेन्सेक्स कशा पद्धतीने कॉपी करणारे फंड कमी खर्च आणि स्थिर परफॉर्मन्स

इक्विटी लींकड सेविंग स्कीम

या गुंतवणुकी चा फायदा हा मुख्य म्हणजे आपल्याला कर वाचवण्यासाठी देखील वापर हा जास्त प्रमाणात केला जातो त्यामध्ये ( income tax act section 80 C अंतर्गत )


त्यामध्ये तीन वर्षाचा लॉक इन पिरेड असतो

Mutual Funds मध्ये गुंतवणुकीस सुरुवात कशी करावी

या गुंतवणुकीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी दोन मुख्य पद्धती आहेत

SIP ( systematic investment plan)

SIP मध्ये दर महिन्यासाठी ठराविक रक्कम गुंतवणूक करणे

उदाहरण द्यायचे झाले तर आपण दर महिन्याला एक हजार रुपयांची SIP कालावधी दहा वर्षासाठी

याचा फायदा काय

मार्केट चा प्रभाव हा कमी होतो व स्वतःलाही बचतीची सवय लागते

लपसम इन्वेस्टमेंट प्लॅन

ज्या गुंतवणुकीमध्ये तुम्हाला एकाच वेळी मोठी रक्कम या ठिकाणी गुंतवणुकी करता येते बाजारचा खाली जात असेल तर यामधून तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळू शकतात

म्युचल फंड चे फायदे

Mutual Funds मध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्यामध्ये प्रोफेशनल मॅनेजमेंट व तज्ञ फंड मॅनेजमेंट हे तुमचा पैसा Mutual Funds मध्ये गुंतवणूक हे करत असतात

डाय व्हर्सिफिकेशन – याचा अर्थ असा होतो की सर्व पैसा हा एकाच ठिकाणी न गुंतवता वेगवेगळ्या साधनांमध्ये गुंतवणूक केल्यामुळे जोखीम देखील त्या प्रमाणात कमी होत असते

कमी पैशांमध्ये गुंतवणूक : कमीत कमी गुंतवणुकीमध्ये जवळपास 500 रुपयांपासून ही तुम्ही एसआयपी मध्ये गुंतवणूक करू शकता

लिक्विडिटी : या फंड्समध्ये तुम्हाला तुमचे पैसे हे कधीही काढता येतात

पारदर्शकता : सेबी च्या नियमानुसार एन ए व्ही अपडेट

Mutual Funds चे नुकसान

Mutual Funds हे मुळामध्ये मार्केट रिस्कवर अवलंबून असते त्यामध्ये इक्विटी फंड व मार्केट घसरल्यास नुकसान देखील पत्करावे लागते

नो गॅरंटी : या गुंतवणुकीमध्ये फिक्स असा काही व्याजदर ठरलेला नसतो यामध्ये फंड मॅनेजर मार्केटच्या परफॉर्मन्सवर अवलंबून असते जर आपण गुंतवणूक करण्यामध्ये चुकलो तर चुकीचे निर्णयामुळे देखील आपल्या नुकसान होऊ शकते

योग्य Mutual Funds कसे निवडाल

उद्दिष्ट बरोबर ठरवा : उद्दिष्ट ठरवा म्हणजे नेमकं काय करायचे त्यामध्ये बघितलं गेलं तर शिक्षण घर खरेदी निवृत्ती प्रवास नेमका कशासाठी आपल्याला गुंतवणूक करायचे आहे हे आधी ठरवलेलं कधीही चांगलं

गुंतवणुकीचा कालावधी काय असेल : थोड्या कालावधीसाठी १ ते ३ वर्ष मध्यम कालावधी ३ ते ५ वर्ष जास्त कालावधी ५ वर्षापेक्षा अधिक

तुम्ही जोखीम किती घेऊ शकता : प्रत्येक जण आपापल्या कुवतीप्रमाणे हा गुंतवणूक करत असतो त्याच प्रमाणात तुम्ही कितपत गुंतवणुकीसाठी रिस्क घेऊ शकता हे देखील आधी ठरवणे गरजेचे असते

फंड चा परफॉर्मन्स तपासून घ्या : ३ ते ५ वर्षाचा मागील परतावा समजून घेणे

एक्सप्रेस रेशो व रेटिंग तपासा : फंड असे निवडा की ज्यामध्ये तुम्हाला खर्च कमी येईल

Mutual Funds मध्ये एक जादू आहे:

कंपाऊंडिंग इफेक्ट

कंपाऊंड म्हणजेच तुम्हाला मिळालेल्या नफ्यावर मिळणारा नफा

उदाहरणार्थ : तुम्ही दर महिन्याला दोन हजार रुपयांची एसआयपी पंधरा वर्षासाठी केली व याचा व्याजदर सरासरी पकडला तर बारा टक्के वार्षिक परतावा पकडून तुम्ही फक्त तीन लाख 60 हजार रुपये गुंतवार व तुमच्याकडे जवळपास दहा लाख रुपये हे जमा होतील

अशा पद्धतीने कंपाऊंडिंग चा फायदा होतो

कर नियम

इक्विटी फंड वरील LTCG ( LONG TERM CAPITAL GAIN ) यामध्ये एक लाखापर्यंत करमुक्त व त्यापुढे दहा टक्के

डेफ्ट वन्स वर वेगवेगळे कर नियम नवीन टॅक्स पद्धतीने नुसार लागू होतात

Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्या नवीन गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीचे काय महत्त्वाचे टिप्स

ज्यांना दीर्घकालीन आणि जास्त रिस्क घेण्याची तर : त्यांच्यासाठी लार्ज कॅप किंवा मल्टी कॅप व इक्विटी फंड्स मध्ये गुंतवणूक करावी

गुंतवणुकीमध्ये कमी असेल तर : त्यामध्ये शॉर्ट टर्म डेथ फंड

कर बचत करायचा असेल तर : ELSS फंड

तुम्हाला मार्केट विषयी कसलेही ज्ञान नसेल तर : त्यासाठी तुम्ही इंडेक्स फंड वापरू शकता

यातून काय घ्याल

Mutual Funds हे आजच्या काळातील सर्वात सोयीस्कर आणि सर्वात सोपी पद्धत ही गुंतवणुकीची आहे त्यामध्ये फक्त ऐकण्यावर विश्वास न ठेवता स्वतः अनालिसिस करून योग्य असे गुंतवणूक करा आणि तुमचे उद्दिष्ट हे कायमच स्पष्ट ठेवा नेमकी तुम्हाला कशा पद्धतीने आणि कशामध्ये गुंतवणूक करायचे आहे व कोणत्या कालावधीसाठी व मी स्वतः किती जोखीम घेऊ शकतो हेदेखील माहिती असणे गरजेचे आहे योग्य शिस्तबद्ध पद्धतीने जर गुंतवणूक केली तर येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्ही एसआयपी सारख्या गुंतवणुकीमधून चांगली संपत्ती ही निर्माण करू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *