टायगर ग्रुप च्या वतीने केंडेपिंपरी-धानोरा-पुनंदगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती जल्लोषात साजरी होणार :अजित गालफाडे

Spread the love

विद्यार्थी गुणगौरव, पत्रकार व समाजसेवकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान

बीड / वडवणी
वडवणी तालुक्यातील टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य व केंडेपिंपरी-धानोरा-पुनंदगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

अजित गालफाडे ( टायगर ग्रुप ता.अध्यक्ष वडवणी )

सामाजिक बांधिलकी जपत कार्यरत असलेला टायगर ग्रुप संस्थापक अध्यक्ष डॉ. पै. तानाजी भाऊ जाधव, मराठवाडा अध्यक्ष पै. गोरक्षक उमेश भाऊ पोखरकर, बीड जिल्हा अध्यक्ष राकेश अण्णा जाधव, तसेच वडवणी ता. अध्यक्ष अजित गालफाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार आहे.

कार्यक्रम १७ ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ६:३० वाजता भव्य सोहळ्यात पार पडणार असून, माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रकाश दादा सोळंके व जयसिंग सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमास प्रारंभ होईल.

विद्यार्थी व मान्यवरांचा गौरव

या जयंती सोहळ्यात पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान होणार आहे.

विद्यार्थी गुणगौरव :
कु. चोले अनुसया बाबासाहेब, कु. पटाई तेजल जालिंदर, चि. आदित्य भीमराव सावंत, कु. गायकवाड धनश्री सचिन, कु. मुंडे पायल लक्ष्मण, शिंपले रोशन बाळासाहेब आणि पार्थ बाळासाहेब खांडवे (वडवणी तालुक्यातील दहावी-बारावीतील तिसऱ्या क्रमांकाचे यश).

आदर्श शिक्षक :
संदीप खटावकर सर, सौरभ खांडवे (क्लासेस वडवणी).

वृक्षमित्र सन्मान :
तीगावचे विद्यमान सरपंच राज पाटील.

पत्रकार गौरव :
साप्ताहिक डोंगरचा राजा चे मुख्य संपादक अनिल वाघमारे व युवा पत्रकार अंकुश गवळी.

दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम

१८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९:०० वाजता केंडेपिंपरी धानोरा ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्वजारोहण समारंभ होईल. या वेळी विद्यमान सरपंच संजय धपाटे व मा. सौ. वर्षा मॅडम (पोलीस स्टेशन, वडवणी) यांच्या हस्ते ध्वजवंदन होईल. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात येईल.

सायंकाळी ५:०० वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन होईल व त्यानंतर भव्य मिरवणूक काढण्यात येईल. या मिरवणुकीला परिसरातील विविध राजकीय पक्षांचे तालुका अध्यक्ष, विद्यमान सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार, शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

सामाजिक बांधिलकीचा उपक्रम

टायगर ग्रुप ही केवळ सामाजिक संघटना नसून समाजहितासाठी नेहमी सज्ज असणारी कार्यकर्त्यांची संघटना आहे. जयंती उत्सवातून विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार, वृक्षमित्र यांचा गौरव करून समाजात प्रेरणादायी संदेश दिला जाणार आहे.

टायगर ग्रुप व वडवणी तालुका अध्यक्ष अजित गालफाडे यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, “आपल्या परिसरातील सामाजिक एकतेचे व सांस्कृतिक वारसाचे प्रतीक असलेल्या या भव्य जयंती सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहा.”

One thought on “टायगर ग्रुप च्या वतीने केंडेपिंपरी-धानोरा-पुनंदगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती जल्लोषात साजरी होणार :अजित गालफाडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *