पावसात माजलगावची दुर्दशा – मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी

Spread the love

मोहन जगताप यांनी रस्त्यावर उतरत नगरपरिषद कर्मचाऱ्यांची केली कानऊघडणी

माजलगाव /
माजलगाव शहरातील मुख्य रस्त्यावर पडणाऱ्या पावसामुळे नरवडे कॉम्प्लेक्ससमोर गेल्या अनेक दिवसांपासून साचलेल्या गुडघाभर पाण्यामुळे व्यापाऱ्यांचे हाल सुरू असून आहेत. यामुळे नागरिक, वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान मोहन जगताप यांनी गुरुवारी दुपारी रस्त्यावर उतरत या प्रश्नासंदर्भात नगरपरिषद कर्मचाऱ्यांची कान उघडनी केली.


दरम्यान यावेळी नागरिकांनी लोकप्रतिनिधीच्या निष्काळजीपणा विषयी संताप व्यक्त केला.

पडणाऱ्या पावसामुळे शहरातील बीड रोड नरवडे कॉम्प्लेक्स समोरील परिसर पाण्याने तुडुंब भरल्या जात आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गुडघाभर पाणी जमा होते.नगर परिषद गेल्या पाच ते सहा वर्षां पासून प्रशासकाच्या ताब्यात आहे. कोणत्याही लोकप्रतिनिधीचे नियंत्रण नाही.नाल्यांची सफाई नसल्याने पावसाचे पाणी नालीत अनं नाल्याचे पाणी रस्त्यावर साचते आणि

शहरातील मुख्य भागात असह्य परिस्थिती निर्माण होते. नगरपरिषद लोकप्रतिनिधींनी आता तरी जागं व्हावं, साचलेल्या पाण्याचा तत्काळ निचरा करून व्यापार आणि नागरिकांचे हाल थांबावेत, यासाठी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन मोहन जगताप रस्त्यावर उतरले. यावेळी त्यांनी रस्त्याची नाल्याची पाहणी केली. व्यापाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. संबंधित विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले. तात्काळ हा प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक शरद यादव शंकर शेंडगे आबा नाईकनवरे सर्जेराव शिंदे शेख रशीद बालाप्रसाद नाटकर गोविंद ईतापे कल्याण जाधव सह व्यापारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *