केज/ प्रदीप गायकवाड
केज शहरातील शारदा इंग्लिश स्कूल शाळेचे प्राचार्य श्री.सोनल महेंद्र मिश्रा यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर

विद्यापीठाकडून पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.त्यांनी “मालती राव,जेसिका मूर,आणि नाओइस डोलन यांच्याकाल्पनिक कथांमध्ये एक स्त्रीवादी मॅट्रिक्स” या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला,तो प्रबंध मंजूर होऊन विद्यापीठातर्फे त्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.
पीएचडी प्रदानकमिटीचे अध्यक्ष मा.प्राचार्य डॉ. मुश्तजीब खान प्रोफेसर इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर हे होते. तर बाह्य परीक्षक म्हणून श्री.एच.एम सरवदे सहाय्यक प्रोफेसर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर हे होते.
डॉ.सोनल मिश्रा यांनी हा प्रबंध मार्गदर्शक श्री डॉ.डी.एन.गंजेवार प्राचार्य प्रल्हादराय दालमिया सायन्स कॉलेज मुंबई (माजी इंग्रजी विभाग प्रमुख व वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय किल्ले धारूर जिल्हा बीड) यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला.पीएचडी हा बहुमान मिळाल्याबद्दल श्री.सोनल मिश्रा यांची सर्वत्र कौतुक होतआहे.
श्री.सोनल महेंद्र मिश्रा यांचे प्राथमिक ते पदवीधर पर्यंतचेशिक्षण इंग्रजी माध्यमात पूर्ण झाले असून पदव्युत्तर शिक्षण त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथे इंग्रजी विषय घेऊन पूर्ण केले.प्रारंभी पासून च बुद्धीने चाणाक्ष,कष्ट व मेहनतीची तयारी व कुशल प्रशासक म्हणून त्यांची ओळख शैक्षणिक क्षेत्रात आहे.
केजशहरातील छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या शारदा इंग्लिश स्कूल या शाळेच्या स्थापनेपासूनच प्राचार्य पदाची धुरा हाती घेतली अत्यंत कमी कालावधी मध्ये सचिव श्री. रमेशरावजी आडसकर साहेब,सौ.अर्चनाताई आडसकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखालीशाळेचा बीड जिल्ह्यातच नव्हे पूर्ण राज्यामध्ये नावलौकिक केला. मिळालेल्या सन्मानाचे श्रेय श्री.रमेशरावजी आडसकर साहेब,आई, वडील परिवार व मित्र परिवार यांना देत असल्याचे सांगितले.
आगामी काळामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये नवनवीन संशोधन करून ग्रामीणभागातील विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल असे आश्वासन दिले. शाळेच्या वतीने सर्व शिक्षक वृंदातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.