केज /
येवता जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत कानडी माळी, टाकळी, डोणगाव, शिरपूरा, आणि केज येथे विविध सामाजिक, धार्मिक व पर्यावरणपूरक कार्यक्रमांमध्ये उपस्थिती लावून ग्रामस्थांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या

📍 कानडी माळी — संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त ह.भ.प. आकृर महाराज साखरे यांच्या कीर्तन सोहळ्यास उपस्थिती. श्रीफळ दहीहंडी उत्सवाचा आनंद घेत भक्तिमय वातावरणात दर्शनाचा योग आला. यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते आदरणीय काकाजी, तालुकाध्यक्ष भगवान केदार, डॉ. नेहरकर, सरपंच अशोक राऊत व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📍 टाकळी — नामदार पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त गावात “प्रत्येक घरी एक फळझाड” या संकल्पनेतून 500 फळझाडांचे वाटप व वृक्षारोपण. प्रमुख पाहुणे म्हणून दत्ताजी बारगजे, सुनील आबा गलांडे, रामकृष्ण घुले काका, भगवान केदार आदी मान्यवर उपस्थित. श्रावण सोमवारनिमित्त फराळाचे आयोजनही झाले.
📍 डोणगाव — 31 जुलै रोजी गावकऱ्यांशी थेट संवाद साधत राजकीय व सामाजिक चर्चा. 1 ऑगस्ट रोजी ह.भ.प. अर्जुन महाराज लाड यांच्या काल्याच्या कीर्तन सेवा सोहळ्यास उपस्थिती.
📍 शिरपुरा — गावभेटीदरम्यान मागील आठ वर्षातील प्रलंबित प्रश्न समजून घेऊन नागरिकांशी राजकीय चर्चा.
📍 केज — कृषी उत्पन्न बाजार समितीत अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमास उपस्थिती. या दरम्यान येवता, कानडी माळी, नागझरी, कोल्हेवाडी, कासारी, उमरी, काळूची वाडी येथील नागरिकांशी सामाजिक व राजकीय चर्चा.
या दौऱ्यात सर्कलमधील नागरिकांनी भारतीय जनता पक्षाकडे सुशिक्षित व नव्या चेहऱ्याच्या उमेदवाराला संधी द्यावी, अशी स्पष्ट मागणी व्यक्त केली.