कला क्रीडा विश्व समितीच्या वतीने घेण्यात आलेली गायन स्पर्धा संपन्न

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

केज /प्रदीप गायकवाड.

Amazon

Amazon App Player

Download Now

दिनांक ३१ जुलै रोजी स्वर्गीय मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथी निमित्त केज येथे कला क्रीडा विश्वास समितीच्या वतीने घेण्यात आलेली मोहम्मद रफी यांच्या गीत गायन स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा सौ सीता ताई बनसोड, भाई मोहन गुंड, शिवाजी दादा ठोंबरे ,शाहीर तुकाराम ठोंबरे, ज्येष्ठ समाजसेवक हनुमंत भोसले ,आर पी आय तालुका अध्यक्ष दीपक कांबळे, या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून लाभलेले लातूर येथील चंद्रशेखर पारशेट्टी,बीड येथील सुरेश थोरात, सर सचिन राऊत सर, पुरोगामी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रंजीत घाडगे, पत्रकार चंद्रकांत पाटील, तात्या गवळी, वसंत बप्पा सोनवणे, दिनकर जाधव, अमोल सावंत, या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्पर्धेला सुरुवात झाली स्पर्धेला नागरिकांतून व स्पर्धकातून मोठा प्रतिसाद होता या स्पर्धेसाठी बऱ्याच ठिकाणाहून स्पर्धक आले होते तर या स्पर्धेत होणारे गीत ऐकण्याकरिता भरपूर संख्यांनी रसिकश्रोते उपस्थित ही स्पर्धा स्त्री व पुरुष गटामध्ये घेण्यात आली. यामध्ये एकूण ५४ स्पर्धक होते १७ महिला व३७ पुरुष यांनी सहभाग घेतला होता पुरुष स्पर्धकांनी मोहम्मद रफी यांचे गीत गाऊन व महिलांनी लता मंगेशकर व इतर गायिकेचे गाणे गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केले या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक लातूर येथील किशोर कांबळे, द्वितीय बक्षीस महेश, तोष्णीवाल तृतीय बक्षीस सुदर्शन शिंदे, व उत्तेजनार्थ जनार्दन वडमारे ,यांनी पटकावले व महिलां मध्ये प्रथम बक्षीस संभाजीनगर येथील दिपाली हरणे, द्वितीय बक्षीस ललिता लांडगे, तृतीय बक्षीस सुरेखा थोटे ,व उत्तेजनार्थ दीक्षा कांबळे, यांनी पटकावले या कार्यक्रमाची प्रस्तावना कला क्रीडा विश्वास समितीचे तालुका अध्यक्ष अनिल वैरागे यांनी केली व आभार उपाध्यक्ष मुनीर कुरेशी यांनी मानले. या स्पर्धेसाठी कला क्रीडा विश्व समितीचे सचिव सचिन लांडगे ,बलभीम मस्के, शिवमुर्ती हजारे, कल्याण मस्के, दिलीप खाडे, अमोल सरवदे, ज्ञानेश्वर लांब, सिंधू मुळे, अनिता कसबे, छबू अंधारे ,या पदाधिकाऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now