१०५ वारणेचा वाघ कादंबरीचे वाटप
माजलगाव /
शहरामध्ये अनिलराधे मित्र परिवाराच्या वतीने लोकशाहिर अण्णाभाउ साठे सार्वजनिक जन्मोत्सव दि. 30 जुलै 2025 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शाहीर शितल साठे, युवराज ढगे, गायक सुमित साळवे आणि संच यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला.कार्यक्रमाचे उद्घाटन बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी केले. अध्यक्षस्थांनी आधार सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिपक थोरात हे तर मा. जिप सदस्या गयाबाई आवाड, सभापती जयदत्त नरवडे, उपसभापती श्रीहरी मोरे, आयोजक अनिलराधे कांबळे, लहुजी विद्रोही सेनेचे भास्कर शिंदे, युवा नेते अमोल शेरकर, राष्ट्वादीचे शहराध्यक्ष राजेश मेंडके, मा. उपनगराध्यक्ष दिपक मुंडे, मानवी हक्क अभियानचे जिल्हाध्यक्ष

राजेश क्षिरसागर, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष हरीष जाधव, सरपंच नारायण भले, सरपंच अजय शिंदे, सरपंच राज अर्जुन, सरपंच रूद्रा कुरे, सरपंच आसाराम शिरसागर, एकनाथ मस्के, सचिन जावळे, उध्दव अरे, पत्रकार सुभाष नाकलगावकर, सुनिल थोरात, राज गायकवाड, हनुमंत तुपसौंदर, सदानंद प्रधान, प्रदीप तांबे, अभिजित देडे, किरण ढगे, मल्हारी ढगे, आकाश थोरात, विलास लोंढे, दत्ता कांबळे, विशाल कांबळे, किरण कांबळे, प्रविण कांबळे, धुराजी कांबळे, सागर कांबळे, मनोज कांबळे, रोहित कांबळे, पांडू कांबळे, राजू कांबळे, धुराजी आडागळे, श्री. अलझेंडे यांची उपस्थिती होती. मोठ्या थाटात कार्यक्रम पार पाडला. शाहीर शितल साठे, युवराज ढगे, गायक सुमित साळवे आणि संच यांच्या गायनाचा कार्यक्रमाने जन्मोत्सवाला रंगत आणली. जन्मोत्सव यशस्वी करण्यासाठी जयंती कमिटीचे अध्यक्ष विक्रम कांबळे, संयोजक रोहित भिसे, उपाध्यक्ष संकेत कांबळे, कोषाध्यक्ष युवराज कांबळे, सहकोषाध्यक्ष शुभम भिसे, सिध्देश्वर कांबळे, शाम कांबळे, प्रदीप कांबळे, सुहास क्षिरसागर, मयूर कांबळे यांचेसह अनिलराधे कांबळे मित्र परिवाराच्या सदस्य, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
१०५ वारणेचा वाघ कादंबरीचे वाटप
या साठे जन्मोत्सव सोहळ्यात हार फुलांचा खर्च न करता लोकशाहीर अण्णाभाउ साठे यांच्या विचारा प्रसार, प्रचार करणारी कादंबरी वारणेचा वाघ वाटप करण्यात आली. 105 व्या जयंतीचे औचित्य साधुन 105 कादंबरीचे वाटप यावेळी करण्यात आले.