बर्दापूरमध्ये हळदी कुंकू–तीळगुळाचा सण उत्साहात

Spread the love

रुद्रम प्रोॲक्टिव्ह अबॅकसचा उपक्रम; महिला शिक्षक व माता-पालकांचा मोठा सहभाग

Verification: 1fe30fb203b45d5d

बर्दापूर | प्रतिनिधी
येथील रुद्रम प्रोॲक्टिव्ह अबॅकस बर्दापूर येथे २५ जानेवारी २०२६ रोजी हळदी कुंकू व तीळगुळ कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमास पंचक्रोशीतील महिला शिक्षक व माता-पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

Amazon

Amazon App Player

Download Now

परंपरा, संस्कार व सामाजिक एकोपा जपण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महिलांमध्ये आपुलकी, स्नेह आणि संवाद वाढीस लागावा, यासाठी हळदी कुंकू व तीळगुळाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान आनंदी व उत्साही वातावरण पाहायला मिळाले.

हा उपक्रम रुद्रम प्रोॲक्टिव्ह अबॅकस बर्दापूरच्या संचालिका सौ. संध्याराणी मधुकर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. शिक्षणासोबतच सामाजिक उपक्रमांमध्येही संस्था पुढाकार घेत असल्याचे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिला व पालकांनी आयोजकांचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे सामाजिक नाते दृढ होत असून ग्रामीण संस्कृती जपली जात असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now