“कमी रेपो रेटचा पूर्ण फायदा द्या” – गव्हर्नरचा इशारा
रेपो दर ५.२५% वर; बँका ग्राहकांना फायदा देण्यास तयार
मंगळवारी झालेल्या बैठकीत संजय मल्होत्रा यांनी स्पष्ट सांगितले की, रेपो रेट कमी झाल्यानंतर ग्राहकांना त्याचा तात्काळ फायदा मिळायला हवा. अनेक बँका दर कमी करण्यास विलंब करत आहेत, यावर आरबीआयने नाराजी व्यक्त केली.
“हे पैसे जनतेचे आहेत… उशीर करू नका,” असे गव्हर्नर यांनी ठामपणे सांगितले.

फेब्रुवारी २०२५ पासून आरबीआयने रेपो दरात १.२५ टक्के (१२५ बेसिस पॉईंट्स) कपात केली असून सध्याचा रेपो रेट ५.२५% झाला आहे. देशाचा GDP वाढदर ८% पेक्षा जास्त असताना, बँका अजूनही जुने व्याजदर आकारत आहेत, हा मुद्दा थेट निदर्शनास आला.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
घर, कार, पर्सनल लोन EMI मध्ये कपात – जानेवारीपर्यंत अपेक्षित
- आरबीआयने बँकांना चेतावणी दिली आहे की,
- जानेवारीपर्यंत EMI कमी झाली पाहिजे
- अन्यथा अधिक कठोर उपाययोजना केल्या जाऊ शकतात
बैठकीत सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँका व मोठ्या खासगी बँकांच्या प्रमुखांचा सहभाग होता.
ग्राहक सेवा, डिजिटल सुरक्षा यावरही भर
- गव्हर्नर यांनी तंत्रज्ञानाच्या वापरामुळे बँकिंग सेवा स्वस्त करण्यावर भर दिला. त्यांनी सांगितले –
- ग्राहक सेवा सुधारावी
- तक्रारींचे तात्काळ निराकरण करावे
- डिजिटल फसवणुकीवर सतर्क राहावे
- सुरक्षा प्रणाली अधिक मजबूत करावी
ही बैठक नियमितपणे घेतली जाणार असून, याआधीची बैठक २७ जानेवारीला झाली होती. म्हणजेच, पुढील काही महिन्यांत बँकांवर काटेकोर नजर ठेवली जाईल.