अमरावती : निम्न पेढी प्रकल्पाला प्राधान्य देत कामाला गती देण्यात येणार असून, बाधित गावांच्या स्थलांतर प्रक्रियेला वेग देण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी सर्व संबंधित यंत्रणांकडून समन्वयाने कामकाज करण्यावर भर दिला.

बैठकीदरम्यान उपजिल्हाधिकारी श्रद्धा उदावंत, प्रसेनजित चव्हाण यांच्यासह प्रकल्पात बाधित पाच गावांचे सरपंच आणि सिंचन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्रकल्पातील हातुर्णा, गोपगव्हाण, कुंड खुर्द, अळणगाव आणि कुंड सर्जापूर या गावांची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली असून, येथील नागरिकांना पुनर्वसित गावात स्थलांतरित करण्याची तयारी सुरू आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
पुनर्वसित गावांमध्ये पाण्याचा पुरवठा, वीज, नाल्या आणि इतर नागरी सुविधा निर्माण करण्यासाठी ५७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या सुविधांचा योग्य विनियोग व्हावा, यासाठी ग्रामस्थांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे जिल्हाधिकारी यांनी नमूद केले. पुनर्वसित गावात पाणीटंचाई जाणवू नये, यासाठी स्वतंत्र नियोजन करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.
स्थलांतरित होणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला दोन लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून, गावात नसलेल्या कुटुंबांचा शोध घेऊन त्यांना माहिती पोहोचवण्याची जबाबदारी स्थानिक सरपंच आणि प्रशासनावर सोपवण्यात आली आहे. तसेच मागणी आल्यास बाधित कुटुंबांना घरकुल मंजूर करण्याची तरतूद शासनाच्या नियमांनुसार करण्यात येणार आहे.
“प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करून नागरिकांचे स्थलांतर सुलभ व्हावे. पुनर्वसित गावात अंगणवाडी, नागरी सुविधा व पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील,” असे आश्वासन जिल्हाधिकारी येरेकर यांनी बैठकीदरम्यान दिले.
प्रकल्पाचा उद्देश पूर्ण झाल्यास परिसरातील सिंचन क्षमता वाढून गावांसाठी शाश्वत पाणी उपलब्ध होणार असल्याने ग्रामस्थांमध्येही या कामाबाबत उत्सुकता दिसून येत आहे.