
परभणी :
परभणी जिल्ह्यातील कौशल्य विकास आणि औद्योगिक संधींना चालना देणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे. ‘सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग’ (CIIIT) या टाटा टेक्नॉलॉजीच्या अत्याधुनिक उपक्रमाला मंजुरी मिळाली असून, हा निर्णय जिल्ह्यासाठी ऐतिहासिक ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
या सुमारे ११५ कोटी रुपयांच्या प्रकल्पामधून दरवर्षी सुमारे ३ हजार विद्यार्थ्यांना इंडस्ट्री ४.० सुसंगत प्रशिक्षण मिळणार आहे. प्रगत तंत्रज्ञान, उत्पादन प्रक्रिया, रोबोटिक्स, डिजीटल मॅन्युफॅक्चरिंग यांसारख्या क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार असल्याने परभणी कौशल्य विकासाच्या नकाशावर ठळकपणे उभे राहील.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
मेघना साकोरे-बोर्डीकरांचा पाठपुरावा
उपक्रमाला मंजुरी मिळण्यात पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकरांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा निर्णायक ठरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने हा प्रकल्प मंजूर झाला असून, ग्रामीण भागातील युवकांना दर्जेदार प्रशिक्षण थेट त्यांच्या जिल्ह्यातच मिळावे, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे सांगितले जात आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी
CIIIT केंद्र सुरू झाल्यानंतर ग्रामीण आणि उपनगरातील विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख कौशल्य प्रशिक्षण घेता येणार आहे.
त्याचा थेट परिणाम रोजगारक्षमता वाढण्यात होणार असून, शहराच्या दिशेने स्थलांतर करण्याची गरज कमी होईल.
आयटी व स्टार्टअप क्षेत्रात नव्या संधी
कौशल्य विकासासोबत सेलू परिसरात आयटी कंपन्या आणण्याच्या उपक्रमालाही वेग मिळत आहे. या माध्यमातून गावातूनच आयटी क्षेत्रात करिअर करण्याची संधी तरुणांसाठी निर्माण झाली आहे.
देवेंद्र फडणवीस स्टार्टअप मिशन अंतर्गत मार्गदर्शन, मेंटॉरशिप आणि पाठबळ देणारे कार्यक्रम राबवले जात असून, “नोकरी शोधणारे” नव्हे तर “नोकरी निर्माण करणारे” तरुण घडावेत, हा उद्देश अधोरेखित केला जात आहे.
महिलांसाठी सक्षमीकरणाची नवी दिशा
महिला बचत गटांना कौशल्य प्रशिक्षण, बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि ‘लखपती दीदी’ संकल्पनेस अनुरूप उत्पन्नवाढ यावर विशेष भर देण्यात आला आहे.
ग्रामीण महिलांच्या हाताला उद्योगाचे बळ मिळाल्याने आत्मनिर्भरता वाढत आहे.
दीर्घकालीन विकासाचा रोडमॅप
कौशल्य, आयटी, स्टार्टअप संस्कृती आणि महिला सक्षमीकरण यांची सांगड पाणी, शेती, आरोग्य, शिक्षण या पारंपरिक क्षेत्रांशी घालून परभणीसाठी दीर्घकालीन विकासाचा नकाशा मंत्री बोर्डीकरांनी मांडला आहे.
विरोधकांच्या टीकेकडे न पाहता विकासाच्या अजेंड्यावर काम करणाऱ्या या तरुण नेत्या आता जिल्ह्याच्या भविष्यासाठी आश्वासक पर्याय म्हणून पुढे येत आहेत.
प्रकल्प मंजुरीतील हातभार
CIIIT केंद्राला मंजुरी मिळविण्यासाठी
वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी,
रजिस्ट्रार श्री. वेणीकर,
आणि परभणी अस्ट्रॉनोमिकल सोसायटी
यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिल्याचे नमूद करण्यात आले.
या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून “कौशल्यशाली, आत्मनिर्भर आणि प्रगत परभणी” या स्वप्नाला आकार मिळू लागल्याची भावना व्यक्त केली जात आहे.