High Speed Internet: भारतात Starlink ने जाहीर केला Subscription Plan, किती लागणार खर्च?

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

Starlink Plan India : भारतातील दुर्गम भागात हायस्पीड इंटरनेटची सुविधा देण्यासाठी इलॉन मस्क यांच्या SpaceX कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. Starlink ने आता भारतासाठी अधिकृत Residential Internet Plan जाहीर केला असून, किंमती आणि वैशिष्ट्यांची माहिती कंपनीच्या वेबसाइटवर अपडेट करण्यात आली आहे.

Amazon

Amazon App Player

Download Now

Starlink कडून देण्यात येणाऱ्या माहितीप्रमाणे, मासिक सब्सक्रिप्शन शुल्क 8,600 रुपये इतके असेल. याशिवाय, डिश आणि राउटरसह हार्डवेअर किटसाठी 34,000 रुपये एकदाच भरावे लागतील. ग्राहकांना 30 दिवसांचा Free Trial देखील दिला जाणार असून, सेवा न आवडल्यास Full Refund मिळू शकणार आहे. प्लानमध्ये Unlimited Data देण्यात येणार आहे.

कंपनीकडून 99.9 टक्क्यांपेक्षा अधिक अपटाइमचा दावा करण्यात आला आहे. पारंपरिक broadband किंवा fiber नेटवर्क उपलब्ध नसलेल्या भागांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे Starlink च्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटीची ही नवी आशा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Starlink ने काही आठवड्यांपूर्वी LinkedIn वर बंगळुरू येथील ऑफिससाठी चार पदांसाठी भरती सुरू केली होती. यामध्ये Payment Manager, Accounting Manager, Senior Treasury Analyst आणि Tax Manager अशांचा समावेश असून, ही भरती कंपनीच्या India Expansion Strategy चा भाग असल्याचे मानले जात आहे.

अहवालांनुसार, भारतातील अनेक शहरांमध्ये Starlink Ground Stations उभारण्याची योजना करत आहे. या स्टेशनमुळे सॅटेलाइट इंटरनेटचा सिग्नल अधिक स्थिर राहील आणि गती सुधारण्यास मदत होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

Starlink ची किंमत प्रीमियम श्रेणीमध्ये असली तरी ज्या भागांत इंटरनेट सुविधा नाही, तिथे ही सेवा मोठा बदल घडवू शकते. पुढील काही महिन्यांत Business आणि Commercial Plans जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now