
नांदेडमधील सक्षम ताटे या तरुणाची हत्या झाल्यानंतर संपूर्ण जिल्हा हादरला आहे. अवघ्या 20 वर्षांच्या सक्षमचा खून प्रेमसंबंधांच्या वादातून झाला असल्याने या प्रकरणाला वेगळं गांभीर्य प्राप्त झालं आहे.
सक्षम आणि आचल मामीडवार यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, या नात्याला आचलच्या कुटुंबियांचा तीव्र विरोध होता. दोन्ही कुटुंबांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचा आरोपही पुढे आला आहे. सक्षमवर अनेक गुन्हे दाखल असून त्याच्यावर तडीपारीची कारवाई झाली होती. तर आचलच्या वडील आणि भावांवरही काही गुन्हे नोंद असल्याची माहिती मिळत आहे.
खुनाच्या रात्रीचा थरार
घटनेच्या काही तास आधीच आचलची आई सक्षमच्या घरी गेली होती आणि “आचलपासून दूर राहा” अशी धमकी देऊन गेली होती. त्यानंतर आचलचे भाऊ सक्षमचा शोध घेत होते. सक्षम घराबाहेर दिसताच त्यांनी त्याला गाठलं आणि बोलावून नेलं.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
काही वेळातच घटनेचा उलगडा झाला — सक्षमवर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. गोळ्या लागूनही सक्षम पळत होता. फरशीवर पाय घसरला आणि तो कोसळला. त्याच फरशीने डोक्यात घालून त्याची हत्या करण्यात आली.
मृतदेहासोबतच विवाह
या दरम्यान आचलला संपूर्ण घटनेची माहिती नव्हती. तिला देवदर्शनाला घेऊन मामाच्या घरी ठेवण्यात आलं होतं. दुसऱ्या दिवशी पेपरमधील फोटो पाहूनच तिला सक्षमच्या मृत्यूची माहिती मिळाली.
क्षणाचाही विलंब न करता आचल थेट पोलिस स्टेशनला गेली आणि “मला सक्षमच्या घरी जायचं आहे” असं सांगितलं. त्यानंतर तिने एक हृदयाला भिडणारा निर्णय घेतला — सक्षमच्या मृतदेहासोबत विवाह. विधी केले, वरमाला घातली आणि “मी आयुष्यभर सक्षमची बायकोच राहणार” असं स्पष्टपणे सांगितलं.
प्रशासनाचा मोठा निर्णय
सक्षमच्या मृत्यूनंतर आचलने एक मोठी मागणी केली होती —
> “माझा भाऊ अल्पवयीन आहे. तो बाहेर आला तर सक्षमच्या कुटुंबाला धोका आहे. त्यांना संरक्षण द्या.”
या मागणीला प्रशासनाने मान्यता दिली आहे. सक्षम ताटे यांच्या संघसेननगर येथील घराबाहेर सहा शस्त्रधारी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. हे कर्मचारी 24 तास पहारा देणार आहेत.
परिसरात तणाव, लोक चिंतेत
या संपूर्ण प्रकरणामुळे संघसेननगर परिसरात तणावाचे वातावरण आहे. प्रेम, विरोध, बदला आणि मृतदेहासोबत विवाह… हे सर्व एका चित्रपटात घडावं तसं वास्तवात घडताना लोकांनी पाहिलं. घटनेने सर्वांनाच हादरवलं आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास सुरु असून पोलिस अधिकारी सतत संपर्कात आहेत.