Teachers Salary Cut : ‘शाळा बंद’ आंदोलनाचा फटका, 96,800 शिक्षकांवर वेतनकपात

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

राज्यातील अनुदानित शाळांमध्ये 5 डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या ‘शाळा बंद’ आंदोलनाची मोठी किंमत आता शिक्षकांना चुकवावी लागणार आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्या तब्बल 96 हजार 800 प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांचा एक दिवसाचा पगार कपात करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

Amazon

Amazon App Player

Download Now

ही कारवाई थेट शिक्षण निरीक्षक आणि शिक्षणाधिकारी कार्यालयांतून करण्यात येणार असून वेतनकपात प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे.

का झाले आंदोलन?

15 मार्च 2024https://deshkarya.com/?p=1816 चा सरकारचा निर्णय रद्द करावा, तसेच शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्यता रद्द करावी, यासाठी विविध शिक्षक संघटनांनी एकत्र येत राज्यात शाळा बंद आंदोलन केले.

मात्र या आंदोलनात सर्व संघटना एकदिलाने दिसल्या नाहीत. अनेक ठिकाणी मतभेद उघड झाले, तर संस्थाचालकांनीच आंदोलनाकडे पाठ फिरवली, असा अहवाल विभागाने दिला आहे.

माध्यमिक शाळा – अर्ध्याहून अधिक सुरूच

राज्यातील 26,490 माध्यमिक शाळांपैकी केवळ 2,539 शाळा बंद राहिल्या.
या शाळांमध्ये काम करणाऱ्या 2,24,366 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी फक्त 13,216 शिक्षक आंदोलनात सहभागी झाले.

अर्थातच, माध्यमिक स्तरावर शाळा मोठ्या प्रमाणात सुरू राहिल्या, असा स्पष्ट चित्र.

प्राथमिक शाळांमध्ये सर्वाधिक फटका

राज्यातील 57,013 प्राथमिक शाळांपैकी 21,477 शाळा पूर्णपणे बंद राहिल्या.
या शाळांमधील 83,584 शिक्षक गैरहजर राहून आंदोलनात सामील झाले.

नाशिक आणि पुणे जिल्ह्यांनी आघाडी घेतली

नाशिक – 2,925 शिक्षक गैरहजर

पुणे – 2,348 शिक्षक गैरहजर

तर धाराशिव जिल्ह्यात कोड ऑफ कंडक्ट असल्याने आंदोलन झालेच नाही.

यवतमाळ, बुलढाणा, नागपूर, मुंबई, ठाणे, भिवंडी, मीरा-भाईंदर, उल्हासनगर – येथे प्राथमिक शाळा सुरळीत सुरू राहिल्या.

माध्यमिक – कोल्हापूर विभागात सर्वाधिक शाळा बंद

माध्यमिक शाळांमध्ये कोल्हापूर विभागात सर्वाधिक 848 शाळा बंद राहिल्या.
एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात 469 शाळा बंद होत्या.

तर सर्वात कमी – सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ 6 शाळा बंद.

बृहन्मुंबई पश्चिम, ठाणे, पालघर, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, रत्नागिरी, धाराशिव, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया – येथे सर्वच शाळा सुरू होत्या.

वेतनकपात – पुढे काय?

शिक्षकांच्या सहभागाची यादी जिल्हावार तयार झाली असून,

सूची प्रमाणे कारवाई थेट वेतनातून

एक दिवसाचा पगार कपात

आदेश लवकरच जारी

आंदोलनाच्या यशापयशापेक्षा, या कारवाईमुळे शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now