
पुणे : कोरेगाव-भिमा येथे विजयस्तंभ अभिवादन दिनानिमित्त हजारो-लाखो अनुयायी येणार असल्यामुळे यावर्षीही सर्वसमावेशक नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत सर्व विभागांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.
बैठकीला बार्टीचे महासंचालक सुनील वारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, पोलीस सहआयुक्त सोमय मुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे तसेच सार्वजनिक बांधकाम, पोलीस, पीएमपीएल, आरोग्य विभाग, पंचायत राज आणि अग्निशमन दलाचे अधिकारी उपस्थित होते.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
परिसरातील कामांना गती
जिल्हाधिकारी डुडी यांनी विजयस्तंभ परिसरातील डागडुजी, दुरुस्ती, फुलांची सजावट, प्रकाशयोजना आणि स्वच्छता यांना तातडीने प्राधान्य देण्याचा आदेश दिला. वाढत्या वाहन वाहतुकीमुळे कोंडी टाळण्यासाठी मोठ्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग झोन, दोनचाकी व छोट्या वाहनांसाठी वेगळ्या जागा, आवश्यक असल्यास तात्पुरत्या पार्किंगची व्यवस्था आणि दिशादर्शक फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले.

महिला आणि पायी येणाऱ्यांसाठी विशेष सोय
पायी येणाऱ्या अनुयायांसाठी सुरक्षित पथ, सावली, पाण्याची ठिकाणे आणि विश्रांती केंद्रांची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले. महिलांसाठी स्वतंत्र मार्ग, हिरकणी कक्ष आणि स्वच्छता सुविधा उभारण्यासही सांगण्यात आले.
स्वच्छतेवर भर
लाखोंची गर्दी लक्षात घेऊन शौचालयांची संख्या वाढवणे आणि मोबाइल टॉयलेट युनिट कार्यरत ठेवण्याचे आदेश दिले.
स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टाक्या आणि पॉईंट स्थळाभोवती उपलब्ध ठेवण्यास सांगितले.
कचरा व्यवस्थापनासाठी विशेष पथके, कंटेनर, डम्पर आणि नियमित संकलनाची व्यवस्था ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.
आरोग्य आणि आपत्कालीन सेवा सज्ज
आरोग्य विभागाला प्राथमिक उपचार केंद्र, डॉक्टर-नर्सिंग स्टाफ, औषधे, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सेवा सातत्याने कार्यरत ठेवण्यास सांगण्यात आले.
कडेकोट सुरक्षा व्यवस्था
सुरक्षेच्या दृष्टीने विस्तृत पोलीस बंदोबस्त, राज्य राखीव पोलीस दलाची मदत, संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही, 24×7 नियंत्रण कक्ष, वायरलेस यंत्रणा, फायर ब्रिगेड आणि ड्रोनद्वारे देखरेख याबाबत संबंधित विभागांना जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या.
बार्टीतर्फे सुविधा
अनुयायांच्या सोयीसाठी बार्टीतर्फे बुक स्टॉल, माहिती केंद्र आणि स्वयंसेवकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जिल्हाधिकारी डुडी यांनी स्पष्ट केले की,
“हा ऐतिहासिक आणि राष्ट्रीय महत्वाचा कार्यक्रम आहे. अनुयायांना सुरक्षित, सुरळीत आणि सन्मानपूर्वक वातावरण मिळण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने आणि वेगाने तयारी करावी.”
विजयस्तंभ अभिवादन दिनासाठी प्रशासनाने सर्व स्तरावर कामांना गती देण्यास सुरुवात केली असून येत्या काही दिवसांत तयारी अधिक वाढवण्यात येणार आहे.