Sadanand Date डॉ. सदानंद दाते होणार नवे पोलीस महासंचालक

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

मुंबई –

Amazon

Amazon App Player

Download Now

राज्याच्या पोलीस महासंचालकपदाची धुरा आता अनुभवी आणि कडक शिस्तीचे अधिकारी Sadanand Date डॉ. सदानंद दाते यांच्याकडे सोपविण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. विद्यमान पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना दिलेला दोन वर्षांचा वाढीव मुदतीचा कालावधी संपत असल्याने हे पद रिक्त होणार असून, त्याची जबाबदारी दाते यांच्याकडे देण्याचा निर्णय झाला आहे.

1990 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले दाते सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख म्हणून केंद्र सरकारकडे प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. वरिष्ठतेनुसार ते राज्यात अग्रस्थानी असून त्यांच्या सोबत संजय वर्मा आणि रितेश कुमार ही नावे महासंचालक पदाच्या शर्यतीत होती. मात्र केंद्र सरकारकडून अखेर दाते यांच्या नावाला मान्यता देण्यात आली आहे. येत्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ते अधिकृतरीत्या पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.

कडक शिस्त, कामातील काटेकोरपणा आणि दहशतवादविरोधी कारवाईतील अनुभव या गुणांमुळे दाते यांची ओळख स्वतंत्र आहे. डिसेंबर 2026 मध्ये ते सेवानिवृत्त होणार आहेत.

मुंबई पोलीस दलात कार्यरत असताना त्यांनी अनेक महत्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या. गुन्हे शाखेचे सह आयुक्त म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. ‘26/11‘ मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या वेळी दहशतवाद्यांना रोखण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष नेतृत्व केले. त्याशिवाय मीरा-भाईंदरचे पोलीस आयुक्त, आयटीबीपीमध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख या पदांवर त्यांनी काम पाहिले आहे.

राज्याच्या सुरक्षेसाठी मोठ्या जबाबदारीचे पद हाती घेणाऱ्या डॉ. दाते यांच्याकडून नागरिकांची मोठी अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now