
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण होत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सहवेदना व्यक्त केली. धनंजय देशमुखांसह परिवारातील सदस्यांची भेट घेऊन प्रकरणातील दोषींवर कारवाई होणार असल्याचा विश्वास पवार यांनी दिला. मात्र या भेटीनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण चांगलेच तापले.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
अजित पवार यांनी भेटीनंतर एक्सवर पोस्ट करून, “हत्येचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. सर्व दोषींना नक्कीच शिक्षा मिळेल,” अशी भूमिका मांडली. पण त्यांच्या या पोस्टवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट हल्ला चढवला.
सपकाळ यांनी धनंजय मुंडे यांच्या अलीकडच्या विधानांचा संदर्भ देत म्हटले, “अजित पवार एकीकडे कुटुंबीयांना धीर देतात, तर त्याच जिल्ह्यातील त्यांचे आमदार गुन्हेगार वाल्मिक कराड यांच्या आठवणीत अश्रू ढाळतात. दोन्ही दगडांवर पाय ठेवू नका; पक्षाची एक काय ती भूमिका जाहीर करा.”
मुंडेंच्या वक्तव्यावरून निर्माण झालं राजकीय वादळ
परळीतील प्रचारसभेत धनंजय मुंडे यांनी केलेल्या एका भावनिक उल्लेखातून गुन्ह्याच्या आरोपातील वाल्मिक कराडची अप्रत्यक्ष आठवण काढल्याची चर्चा रंगली. “आपल्याबरोबर आपला एक व्यक्ती नाही,” असे म्हणताना नेमका कोणाकडे सूचक इशारा होता, यावरून राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात तर्कवितर्क सुरू झाले. विरोधकांनी तिथेच संधी साधत मुंडेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
देशमुख कुटुंबीयांना अनेक नेत्यांच्या भेटी
घटनेला एक वर्ष पूर्ण होत असताना सकाळपासूनच विविध नेत्यांच्या भेटींची रेलचेल पाहायला मिळाली. संदीप क्षीरसागर, सुरेश धस, मनोज जरांगे-पाटील, ज्योती मेटे, अंबादास दानवे, विजयसिंह पंडित आदींनी देशमुख परिवाराची भेट घेत संवेदना व्यक्त केल्या. याच पार्श्वभूमीवर माजलगावातील प्रचार दौऱ्यातील वेळ काढून अजित पवारांनीही मस्साजोग गाठत कुटुंबीयांची विचारपूस केली.
पुढे काय?
संतोष देशमुख हत्याकांडात न्यायाची लढाई सुरू असताना, त्याच प्रकरणाच्या संदर्भातून निर्माण झालेल्या राजकीय विधानांवरून आता नव्या वादाची ठिणगी पडली आहे. एकीकडे अजित पवार शांततेचा संदेश देत असतानाच, काँग्रेसकडून उचललेले प्रश्न हे आगामी निवडणूक वातावरणात नवं राजकीय समीकरण निर्माण करू शकतात, यात शंका नाही.
हत्याकांडाचा तपास, न्यायालयीन प्रक्रिया आणि राजकीय प्रतिक्रिया – या सर्वांचा संगम बीडच्या राजकारणात पुढील काही दिवस तापट चर्चांना तोंड फोडणार, हे निश्चित.