देशांतील मोठया शहरांमधील वायू प्रदूषणाने लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम जागतिक आरोग्य संघटना

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

नवी दिल्ली /

Amazon

Amazon App Player

Download Now

देशांतील मोठया शहरांमधील वायू प्रदूषणाने लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे असे चित्र सध्या आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. राजधानी नवी दिल्लीमध्ये वायू प्रदूषण आता केवळ श्वसनाचा धोका राहिलेला नाही, तर शहरांतील लहान मुलांच्या आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. शहरात लहान मुलांच्या डोळयांवर दिसणारे चष्म्याला मोबाइल फोन स्क्रीनचा अतिवापराला कारणीभूत ठरवले जाते. मात्र भारतातील प्रमुख महानगरांमध्ये मेट्रो शहरांमध्ये डॉक्टरांना मुलांमध्ये लहान मुलांमध्येही मायोपिया जवळचे कमी दिसणे समस्या आढळून येत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने व देशातील महानगरांमधील नेत्ररोग तज्ञांनी खराब हवेमुळे हा विकार मुलांमध्ये वाढत असल्याचे स्पष्ट केले आहे.


भारतातील दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, बंगळूरु आणि इतर प्रदूषित महानगरांमध्ये नेत्ररोग तज्ज्ञांनी नोंदवले आहे की, मुलांमध्ये मायोपिया जवळचे कमी दिसणे पूर्वीपेक्षा खूप लवकर विकसित होत आहे. अशा मुलांच्या संख्येत होणारी वाढ ही काळजी वाढविणारी आहे. डोळयांसाठी हानिकारक असणारे हवेतील लहान कण, कमी झालेला दिवसाचा प्रकाश याचा शहरी मुलांच्या डोळयांच्या आरोग्यावर होणाऱया परिणामाचाही अभ्यास केला जात आहे.
पूर्व आशियामध्ये मायोपियाने आधीच साथीचे रूप घेतले आहे. जागतिक आरोग्य संस्थांनी स्पष्ट केले आहे की, सध्याचे महानगरांधील हवेची गुणवत्ता अशीच खालावत राहिल्यास भारतही त्याच दिशेने जाऊ शकतो. जागतिक आरोग्य संस्थांचा अंदाज आहे की, 2050 पर्यंत जगातील अर्धी लोकसंख्या मायोपियाने ग्रस्त असेल. यासाठी पर्यावरणीय घटक मोठी भूमिका बजावतील. अभ्यासातून हे देखील दिसून आले आहे की, घराबाहेर घालवलेला कमी वेळ आणि नैसर्गिक प्रकाशाच्या संपर्कात कमी येणे, या दोन्ही गोष्टींवर वायू प्रदूषणाचा मोठा परिणाम होतो, ज्यामुळे लहान मुलांमध्ये लवकर मायोपिया होण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो.आता भारत देशातील मोठया महानगरांमधील नेत्ररोग तज्ञांनी व जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, खराब हवेमुळे हा विकार देशातील लहान मुलांमध्ये जास्त वाढत असल्याचे स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now