आमदार राजेश विटेकर यांच्या हस्ते करम येथे सीसीआय कापूस खरेदी केंद्राचे उद्घाटन

Spread the love

सीसीआय कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ; शेतकऱ्यांना दिलासा देणारा उपक्रम

Verification: 1fe30fb203b45d5d

सोनपेठ /
सोनपेठ तालुक्यातील मौजे करम येथे शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणारे सीसीआय कापूस खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. सालासर जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी येथे या केंद्राचा शुभारंभ आमदार राजेश विटेकर यांच्या हस्ते बुधवार, 19 नोव्हेंबर रोजी करण्यात आला.

Amazon

Amazon App Player

Download Now

या केंद्रामुळे परिसरातील हजारो कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव, पारदर्शक खरेदी व्यवस्था आणि वेळेवर सेवा उपलब्ध होणार आहेत. शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य दर मिळावा आणि हमीभावाने खरेदीची हमी मिळावी, या उद्देशाने हे केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती उद्घाटनप्रसंगी देण्यात आली.

उद्घाटनावेळी बोलताना आ. विटेकर म्हणाले, “शेतकऱ्यांच्या श्रमाला न्याय्य मूल्य मिळणे ही काळाची गरज आहे. सीसीआय खरेदी केंद्रामुळे ग्रामीण भागातील कापूस उत्पादकांना आर्थिक स्थैर्याचा विश्वासार्ह आधार मिळेल.”

कार्यक्रमाला जि.प. माजी सभापती विठ्ठलराव सूर्यवंशी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती उत्तमराव जाधव, प.स. माजी सभापती मदनराव विटेकर, तसेच श्रीकांत मोरे, रामेश्वर मोकशे, जगदीशजी सारडा, दत्तात्रय भोसले (मार्केट कमेटी सचिव), हारून सय्यद, बळीराम भोसले, वेदांत सारडा, शाम मुंदडा, रामेश्वर सारडा यांच्यासह स्थानिक सरपंच–उपसरपंच, संचालक, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

केंद्र सुरू झाल्याने सोनपेठ परिसरातील कृषी अर्थव्यवस्थेला नवी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना बाजारपेठेचा मार्ग सुकर होत असल्याने या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now