छत्रपती संभाजीनगर : जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेणी परिसरात शनिवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. पुण्यातील योगिता महेश सावंत (वय 43) या पर्यटक महिलेचा पायऱ्या चढत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. अचानक प्रकृती बिघडल्याने लेणी परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
मिळालेल्या माहितीनुसार, सावंत कुटुंब शनिवारी सकाळी लेणी परिसरात फेरफटका मारत होते. लेणी क्रमांक एककडे जाणाऱ्या पायऱ्या चढत असताना योगिता सावंत यांना छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. त्यांच्या प्रकृतीचा बिघाड पाहून सोबतच्या नातेवाइकांनी तातडीने मदतीसाठी हाक दिली.
घटनेची माहिती मिळताच तैनात पोलिस कर्मचारी भरत कोळी यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेत प्राथमिक मदत करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी रुग्णवाहिका चालक अमर जाधव यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या रुग्णवाहिकेतून योगिता सावंत यांना अजिंठा रुग्णालयात हलवले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. या घटनेने सावंत कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
अजिंठा लेणीसारख्या उंचसखल आणि मेहनत घेणाऱ्या भूभागात पायऱ्या चढताना आरोग्याची काळजी घेण्याची गरज पुनः एकदा समोर आली आहे. पर्यटनस्थळी तात्काळ मदत मिळूनही जीव वाचवता न आल्याची खंत स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अशाच प्रकारची घटना गिरनार पर्वतावर घडली होती. देवदर्शनासाठी आलेले प्रसाद उर्फ बाळा रवींद्र संसारे (वय 46, रा. गुहागर) हे सुमारे 600 पायऱ्या चढल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे अशा कठीण चढाईच्या ठिकाणी आरोग्य तपासणी आणि प्रतिबंधात्मक उपायांची गरज अधोरेखित होत आहे.