ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये सोमवारी संध्याकाळी एक हृदयद्रावक अपघात घडला. अंबरनाथ पूर्व–पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलावर भरधाव वेगाने आलेल्या कारने अनेक दुचाकींना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काहीजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथच्या हुतात्मा चौकातून पश्चिमेकडे जाणारी एक कार अचानक नियंत्रणाबाहेर गेली. वाहतूक कोंडी कायम असणाऱ्या या पुलावर कारने समोर असलेल्या दुचाकींना चिरडले. धडक इतकी भीषण होती की एक व्यक्ती थेट पुलाखाली कोसळला, तर इतर काही जण रस्त्यावर फेकले गेले.
अपघातानंतर कारही पलटी झाली. या संपूर्ण घटनेचा थरार जवळील CCTV कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला असून व्हिडिओमध्ये अपघातानंतर काही मुले आणि नागरिक घटनास्थळी धावताना दिसतात. घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती ताब्यात घेतली.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
दरम्यान, संबंधित कार कोणाची होती आणि ड्रायव्हरने नियंत्रण का गमावले? याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. जखमींना तातडीने उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अचानक झालेल्या या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी अपघाताचा पुढील तपास सुरू केला आहे.