चोरीला गेलेले २२ हजार अखेर परत; फिर्यादीच्या चेहऱ्यावर समाधान

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

माजलगाव शहरातील बस स्थानकात घडलेल्या चोरीतील २२ हजार रुपयांची रोकड सहा महिन्यांनंतर अखेर मालकाच्या हाती परत आली असून, फिर्यादी धनंजय किसनराव ताटे यांनी पोलिसांप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Amazon

Amazon App Player

Download Now

घटना 2 जून 2025 रोजीची. उमरखेड-ते-अहिल्यानगर बसमध्ये चढत असताना ताटे यांच्या खिशातील २२,000 रुपये तीन अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी माजलगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. 205/2025 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 303(2), 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.

पोलिस निरीक्षक राहुल सुर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोह. 1068 कृष्णा जायभाये यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. सीसीटीव्ही फुटेजचा योग्य वापर, तांत्रिक तपास आणि कौशल्यपूर्ण चौकशीतून तीन आरोपी — दत्ता ज्ञानेश्वर गुंजाळ, चंदू लक्ष्मण गायकवाड आणि सचिन विश्वनाथ साठे (सर्व रा. बीड) — यांना निष्पन्न करण्यात पोलिसांना यश मिळाले.

तपासात आरोपींकडून चोरी केलेली २२,००० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. ही रक्कम आज (दि. 21 नोव्हेंबर 2025) पोलिस निरीक्षक राहुल सुर्यतळ यांच्या हस्ते फिर्यादी धनंजय ताटे यांना परत करण्यात आली. पैसे परत मिळताच ताटे यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते. त्यांनी पोलिस दलाचे आभार मानले.

या कार्यवाहीत पोलीस अधीक्षक नवनित कवठे, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणीपोउपनि तुळशीराम जगताप, पोह. कृष्णा जायभाये, पोह. किशोर जाधव आणि पोह. बाळकृष्ण जायभाये यांनी महत्त्वाची भूमिका बजावलि

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now