यशदा उपप्रबंधक मल्लिनाथ कलशेट्टी यांनी घेतला अंमलबजावणीचा आढावा

कर्जत /
– ग्रामीण विकासाला नवे बळ देण्यासाठी राज्य सरकारने हाती घेतलेल्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत’ अभियानाला कर्जत तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे. ग्रामपंचायतींचे सुशासन, पारदर्शकता आणि नागरिकांपर्यंत सेवा पोहोचवण्याची गती वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असून, या संपूर्ण प्रक्रियेचा सखोल आढावा यशदा येथील उपप्रबंधक मल्लिनाथ कलशेट्टी यांनी घेतला.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
कलशेट्टी यांनी तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी, पदाधिकारी आणि यशदा प्रशिक्षकांशी संवाद साधत योजनांची प्रभावी अंमलबजावणी, आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील सहभाग वाढवणे, सामाजिक न्यायाचे बळकटीकरण आणि ग्रामसेवांच्या सुलभीकरणावर मार्गदर्शन केले. लोकसहभागातून स्पर्धात्मक वातावरण तयार करून गावांच्या सर्वांगीण विकासाला गती देणे हे अभियानाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
अभियानामुळे गावांना मोठ्या संधी उपलब्ध होत असून, पायाभूत सुविधा ते जीवनमान उंचावण्यापर्यंत अनेक पातळ्यांवर सकारात्मक बदल जाणवू लागल्याची प्रतिक्रिया स्थानिक प्रशासनाने दिली आहे. कर्जत तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये या अभियानातील उपक्रमांमुळे कार्यक्षमता वाढल्याचे निरीक्षण बैठकीत मांडण्यात आले.
या बैठकीस यशदा संचालक आनंद पुसावळे, गटविकास अधिकारी अजिंक्य सूर्यवंशी, सहायक गटविकास अधिकारी रूपचंद जगताप, तसेच यशदा प्रशिक्षक आणि ग्रामपंचायत अधिकारी नवनाथ गोरे, राहुल जगताप, प्रथमेश शुक्ल उपस्थित होते.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
ग्रामीण विकासाची नवी लाट गावोगाव पोहोचवण्यासाठी हे अभियान महत्त्वाची भूमिका बजावत असून, अधिकाधिक ग्रामस्थांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन प्रशासनासह यशदा अधिकाऱ्यांनी केले आहे