अहिल्यानगर शहर अपर तहसील कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरू; नागरिकांसाठी महसूल सेवा अधिक सुलभ

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

अहिल्यानगर : शहरातील नागरिकांना आता सर्व महसूल सेवा एकाच ठिकाणी, तेही पूर्ण क्षमतेने, मिळणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात पहिल्यांदाच सुरू झालेल्या अहिल्यानगर शहर अपर तहसील कार्यालयात नियमित कामकाजाला गती मिळाली असून नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.

Amazon

Amazon App Player

Download Now

अपर तहसीलदार स्वप्नील ढवळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सुमारे ४.५ लाख लोकसंख्येसाठी आवश्यक महसूल कामे अधिक वेगाने आणि पारदर्शकतेने पार पडत असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

शहरातील १२ गावांचा समावेश

केडगाव, नालेगाव, भिंगार, सावेडी, नागापूर, माळीवाडा यांसह शहर हद्दीतील १२ गावांचा समावेश या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात करण्यात आला आहे.

५ महसूल मंडळे – ९ तलाठी सजा

नवीन कार्यालयातून पाच महसूल मंडळांद्वारे कामकाज होत असून नागरिकांसाठी नऊ तलाठी सजा कार्यरत आहेत.

सर्व महसूल सेवा आता एकाच ठिकाणी

जमीनविषयक दाखले, फेरफार, गौण खनिज, तसेच विलंबाच्या जन्म–मृत्यू नोंदींसह सर्व महसूल सेवा एकाच छताखाली उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

हे नवीन कार्यालय जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारात सुरू करण्यात आले असून वाढत्या कामकाजाचा भार लक्षात घेऊन मनुष्यबळातही वाढ करण्यात आली आहे.

कार्यरत अधिकारी

नायब तहसीलदार

सहाय्यक महसूल अधिकारी – सोनाली कुलकर्णी, श्रद्धा पारगावकर

महसूल सहाय्यक – आत्माराम गाडेकर, संजय गोलेकर

तलाठी – शुभांगी जगताप

मंडलाधिकारी – शैलजा देवकाते (सावेडी), शेखर साळुंके (नागापूर), वैशाली दळवी (भिंगार), रुपाली टेमक (केडगाव), वर्षा पवार (नालेगाव)

नवीन अपर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षम व्यवस्थेमुळे अहिल्यानगर शहरातील नागरिकांसाठी जलद, सक्षम आणि सुलभ महसूल सेवा आता वास्तवात उतरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now