परभणी /
बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या निर्णायक विजयाचा उत्साह शुक्रवारी परभणीत ठिकठिकाणी पाहायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची अतिशबाजी, गुलालाची उधळण आणि जोरदार घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.

विजयाची बातमी कळताच कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले आणि परिसर क्षणात जल्लोषाने दुमदुमला.
या कार्यक्रमाला जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, माजी आमदार सुरेश वरपुडकर, महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, तसेच विलास बाबर, श्रीधर देशमुख, मोकींद खिल्लारे, भालचंद्र गोरे, हम्मु चाऊस, लक्ष्मीकांत क्षीरसागर, बबलू टाक, सचिन अंबिलवादे, रितेश जैन, शिवाजीराव मवाळे, शंकर आजेगांवकर, दिनेश नरवाडकर, राजेश देशपांडे, प्रवीण चौधरी, सौ. मंगल मुदगलकर, प्रशांत सांगळे, अद्वैत पार्डीकर, सुशिल देशमुख, प्रभावती अन्नपूर्णे, मोहन कुलकर्णी, ऋतुजा जोशी, छाया मोगले, मनिषा जाधव, प्रभाकर पाटील वाघीकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
नेतेमंडळींनी विजयाबद्दल आनंद व्यक्त करत बिहारमधील जनतेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संपूर्ण परिसर भरभरून घोषणांनी भरून गेला आणि जवळपास अर्धा तास जल्लोष सुरू होता.