नारायणगाव /
नारायणगाव आणि जुन्नर परिसरात मध्ये घरफोड्यांची सत्र घडवून पोलिसांना चकवा देणाऱ्या सराईत अट्टल गुन्हेगाराला अखेर पोलीसांनी जेरबंद केले आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने केलेल्या या कारवाईत १६ तोळे सोने, ८४१ ग्रॅम चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि मोटारसायकल असा एकूण १४ लाख ३७ हजार ६५० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण सपांगे आणि एपीआय महादेव शेलार यांनी दिली.

अटक केलेला आरोपी विशाल दत्तात्रय तांदळे (वय २८, रा. मंचर, ता. आंबेगाव, मूळ रा. पाटेगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर) हा सराईत गुन्हेगार असून जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत घरफोडी व मालमत्ता चोरीचे तब्बल २८ गुन्हे त्याच्यावर नोंद असल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडून नारायणगाव व जुन्नर येथील तीन घरफोडींचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
नारायणगावातील दिवाळीच्या काळातील चोरी उलगडली
नारायणगावच्या वैभवलक्ष्मी सोसायटीतील रहिवासी विष्णू भागूजी सांगडे (वय ६२) हे दिवाळी निमित्त दागिने घरी घेऊन आले होते. १४ ऑक्टोबर रोजी पहाटे ते पत्नीसमवेत मुक्ताबाई देवीच्या काकड आरतीसाठी गेल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम मिळून सुमारे ११ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणाची नोंद नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये झाली होती.
चोरीनंतर आरोपी मोटारसायकलवर पसार झाल्याचे सीसीटीव्हीत दिसून येताच पोलिसांनी त्या वाहनाचा तपास केला. चौकशीत ती मोटरसायकल आरोपी विशाल तांदळे याची असल्याचे निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीत त्याने नारायणगाव आणि जुन्नर परिसरातील तीन घरफोड्यांची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याकडून चोरीचा पूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
कारवाईत अनेक पथकांचा सहभाग
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, एपीआय प्रविण सपांगे, एपीआय महादेव शेलार, पोलीस उपनिरीक्षक सोमेशेखर शेटे तसेच पोलीस अंमलदार दीपक साबळे, राजू मोमीन, संदीप वारे, अक्षय नवले, मंगेश लोखंडे, सत्यम केळकर, सोमनाथ डोके आणि निलेश जाधव यांनी या संयुक्त कारवाईत सहभाग घेतला.
पोलीसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे परिसरातील घरफोडी प्रकरणांना मोठा आळा बसला असून नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे.