माजलगावात भर दुपारी महिलेच्या नाकावर गुंगी आणणारा रूमाल टाकून दिड तोळे सोने लुटले

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

माजलगाव /
शहरात भरदिवसा घडलेल्या गुन्ह्याने एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात इसमाने वृद्ध महिलेला नाकावर गुंगी आणणारा रुमाल दाबून दीड तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना बुधवार दि.१२ रोजी दुपारी शहरातील बीड रोडवर मुख्य रहदारींच्या ठिकाणी घडली.

Amazon

Amazon App Player

Download Now
Dreamstime

याबाबत समजलेली माहिती अशी की, तोताबाई काळू राठोड ङ (वय ६५ वर्ष) राहणार नित्रुड तांडा.या आपल्या नातवाला कपडे घेण्यासाठी नित्रुड गावावरून माजलगावला आल्या होत्या. कपडे खरेदीसाठी त्या एका दुकानात जात असताना दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्याशी संवाद साधत

असताना अचानक गुंगी आणणारा रुमाल त्यांच्या नाकावर दाबला गेला. काही क्षणात महिला बेशुद्ध पडताच त्या व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने नाकातील नथ, सेवन पीस, तब्बल दीड तोळे सोने हिसकावून पळ काढला असून . दरम्यान बेशुद्धावस्थेतून शुद्धीवर आल्यानंतर महिलेने ही माहिती नातेवाईकांना दिली. नातेवाईकासह पीडित महिलेने पोलीस स्टेशन गाठले असून सदरील घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरेद्वारे घटनाक्रम समजून घेऊन तपासाची सूत्रे फिरवले आहेत. दरम्यान, शहरात या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now