माजलगाव : ( प्रतिनिधी )
माजलगाव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनांक १२ नोव्हेंबर रोजी शहरातील व्यंकटेश हॉटेल मध्ये रिपब्लिकन सेनेच्या इच्छुक उमेदवारांची मुलाखत बैठक जिल्हाध्यक्ष विजय दादा साळवे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सकाळी ११ ते दुपारी ०३ वाजे पर्यंत इच्छुक उमेदवारांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

रिपब्लिकन सेना व शिव सेना (शिंदे गट ) महाराष्ट्रात राज्यभर आगामी नगर परिषद निवडणुकीत युतीच्या माध्यमातून निवडणुक लढवणार असून माजलगाव शहरातील रिपब्लिकन सेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती साठी जिल्हाध्यक्ष विजय साळवे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १२ रोजी व्यंकटेश हॉटेल मध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते , सकाळी ११ ते दुपारी ०३ वाजे दरम्यान इच्छूक उमेदवारांनी एकच गर्दी केली असता प्रभाग क्रमांक ०१ ( ब ) प्रभाग क्रमांक ०२ (अ ) व ( ब ) प्रभाग क्रमांक ०४ (ब) या एकूण चारही प्रभागा मध्ये रिपब्लिकन सेनेची मोठी ताकद असुन युतीच्या माध्यमातुन जागा लढवण्याचा निर्धार बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. व लवकरच शिवसेनेच्या नेत्यांसोबत चर्चा करून रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारी अर्ज भरण्यात येणार असल्याचे ठरवण्यात आले. प्रसंगी रिपब्लिकन सेनेचे डि. एल. भालेराव, विलास गायसमुद्रे, ॲड. नंदकिशोर खळगे, पंडित ओव्हाळ, विश्वनाथ तोडके, संतोष खुणे, विशाल साळवे, शेख अर्शद, सय्यद अन्वर, धम्मानंद गावडे, भास्कर पौळ, राजु टाकणखार, प्रकाश शिंदे आदींची उपस्थिती होती. तालुकाध्यक्ष वशिष्ठ लांडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले यावेळी रिपब्लिकन कामगार सेनेच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी प्रत्रकार सुभाष बोराडे यांची निवड झाल्या बद्दल माजलगाव तालुका कार्यकारणीच्या वतीने यथोचीत सत्कार करण्यात आला.