मराठा संघर्ष योध्दा जरांगे पाटील यांना झेडप्लस सुरक्षा प्रदान करा : आ. प्रकाश सोळंके यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

माजलगाव /

Amazon

Amazon App Player

Download Now

मराठा संघर्ष योध्दा मनोजदादा जरांगे पाटील यांची सुपारी देवुन हत्या घडवणा-या कटाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून कायदेशिर कारवाई करावी तसेच जरांगे पाटील यांना राज्यशासनाने झेडप्लस सुरक्षा प्रदान करावी अशी मागणी माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचेकडे पत्राव्दारे दि. 6 नोव्हेंबर 2025 रोजी केली आहे.

दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मराठा आरक्षण योध्दा मनोजदादा जरांगे पाटील यांची 2.5 कोटी रू. ची सुपारी देवुन हत्या घडवण्याचा प्रयतन झाल्याबाबत जालना पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल झाली असून संशयीत दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. या संदर्भात वृत्तवाहिन्यानी बातम्या देखिल प्रसिध्द केल्या आहेत. त्यामुळे या घटनेचा तिव्र निषेध व्यक्त करत या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून दोषींविरूध्द कायदेशीर कारवाई करावी व मराठा संघर्ष योध्दा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या जिवीतास धोका निर्माण झाल्याने त्यांना झेडप्लस सुरक्षा प्रदान करावी अशी मागणी माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचेकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now