गावकऱ्यांच्या वतीने गुणवंतांचा सत्कार

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

माजलगाव /
तालुक्यातील मोठेवाडी येथील गुणवंत विद्यार्थी डॉ. रेणुका महादेव खेत्री, डॉ.सचिन विष्णू खेत्री, डॉ.अक्षय लक्ष्मण खेत्री यांनी बी.एच.एम.एस. ही पदवी प्राप्त केली. याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा दि.3 आक्टोंबर शुक्रवार रोजी सत्कार करण्यात आला.
तालुक्यातील मोठेवाडी येथील संत सावता महाराज मंदिरात नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते,
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता परिषदेचे तालुकाध्यक्ष जगन्नाथ खेत्री हे होते तर डॉ. रामेश्वर जंगले,विश्वनाथ खेत्री, विष्णु खेत्री, नाथाराव खेत्री, अंगद खेत्री,भारत खेत्री, सुदर्शन हिवरकर, सुभाष सर्जे, विलास खेत्री, भगवान पवार, गजानन गोंडे, चक्रधर हिवरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सोमेश्वर हिवरकर यांनी तर आभार लक्ष्मण खेत्री यांनी मानले.
मोठेवाडी येथील शेतकरी कुटुंबातील मुलांनी वैद्यकीय क्षेत्रातील पदवी संपादन केली, त्याबद्दल गावकऱ्यांनी त्यांचा नागरी सत्कार केला. या आयोजनात समता परिषदेचे तालुकाध्यक्ष जगन्नाथ खेत्री यांच्यासह गावकऱ्यांचा सहभाग होता, या सत्कार सोहळ्यात, गावकऱ्यांनी या गुणवंत विद्यार्थ्यांसोबत त्यांचे आई -वडील पालक यांच्यासह त्यांचा सत्कार करुन त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे कौतुक केले, आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Amazon

Amazon App Player

Download Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now