Jayakwadi Dam : जायकवाडी धरणातून १,७९,२०८ क्युसेक पाण्याचा विसर्ग

Spread the love

गोदावरीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

छ. संभाजीनगर
जायकवाडी धरणातून विसर्गा मध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आलेली आहे. पूर नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज रविवार दि. २८ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १.३० ते २.०० या वेळेत धरणाचे द्वार क्रमांक १० ते २७ अशी तब्बल १८ नियमित गेट अर्धा फूटाने अधिक वर उचलण्यात येणार आहेत. त्यामुळे गेट ७.५ फूट गेट उघडले जाणार असून गोदावरी नदीपात्रात तब्बल ९,४३२ क्युसेक पाणी अधिक सोडले जाणार आहे.

धरणातून सध्या सांडव्याद्वारे १८ नियमित आणि ९ आपत्कालीन गेटमधून १,६९,७७६ क्युसेक विसर्ग सुरू आहे. नव्याने होणाऱ्या विसर्गामुळे हा आकडा १,७९,२०८ क्युसेकवर पोहोचणार आहे. जायकवाडी धरण क्षेत्रात वाढती आवक लक्षात घेऊन परिस्थितीनुसार विसर्गात वेळोवेळी वाढ किंवा घट करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे

दरम्यान, धरणातून होणारा वाढीव पाणी विसर्ग थेट गोदावरी नदीपात्रात सोडला जात असल्याने नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदीकाठच्या खेड्यांमध्ये पाणी पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता असल्याने पूरबाधित भागात जाणे टाळावे, असा इशारा देखील प्रशासनाने दिला आहे.

पूर नियंत्रण कक्ष, जायकवाडी प्रकल्प, पैठण यांच्याकडून नागरिकांना सतत सूचना दिल्या जात आहेत. स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now