Jayakwadi Dam : जायकवाडी धरणातून १,३२,०४८ क्युसेक पाण्याचा विसर्ग

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

छ. संभाजीनगर
जायकवाडी धरणातून रविवार दि. २८ सप्टेंबर रोजी आज सकाळी ९.३० वाजता आणखी एकदा विसर्ग वाढविण्यात आला आहे. सकाळी ९.३० ते १० या वेळेत प्रकल्पाचे १० ते २७ अशी एकूण १८ नियमित गेट्स अर्धा फूट ते पाच फूटपर्यंत उचलण्यात आले. याद्वारे तब्बल ९,४३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात करण्यात आला आहे

Amazon

Amazon App Player

Download Now

सध्या धरणातून एकूण १३२०४८ क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. यात १८ नियमित गेटमधून १,२२,६१६ क्युसेक तर ९ आपत्कालीन गेटमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा समावेश आहे. धरणातील पाण्याची आवक सतत सुरू असल्यामुळे विसर्गा मध्ये वेळोवेळी वाढ अथवा घट करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
वाढीव विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गोदावरी नदी काठच्या नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन पूर नियंत्रण कक्ष, जायकवाडी धरण प्रशासनाने केले आहे.

जायकवाडी प्रकल्पातील १८ नियमित गेट्स अर्धा ते ५ फूट उचलले

९,४३२ क्युसेक अतिरिक्त विसर्ग सुरू

एकूण विसर्गाचा आकडा १,३२,०४८ क्युसेकवर

गावकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे

पाण्याची आवक वाढत असल्याने पुढील काही तासांत परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून निर्णय घेतले जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now