Majalgaon:शुक्लतीर्थ लिमगावचा संपर्क तुटला; ग्रामस्थांसाठी धोक्याची परिस्थिती

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

बीड : माजलगाव तालुक्यातील शुक्ल तीर्थ लिमगाव या गावाचा गोदावरी नदीला पुरामुळे दळणवळणाचा मुख्य रस्ता तब्बल १५ ते २० दिवसांपासून बंद पडला आहे. गावाच्या मुख्य दळणवळणाच्या रस्त्यावर पाणी साचल्याने गावातील नागरिकांचा शेजारच्या गावांशी पूर्ण पणे संपर्क तुटला आहे

Amazon

Amazon App Player

Download Now

स्थानिक ग्रामस्थांकडे गावामधून बाहेर जाण्यासाठी पर्यायी मार्ग नसल्याने नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून पाण्यातून ये-जा करावी लागत आहे. यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गावातील एखादी व्यक्ती आजारी पडल्यास किंवा इमर्जन्सी परिस्थिती निर्माण झाल्यास गंभीर अडचण निर्माण होईल, अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. याच पार्श्वभूमीवर माजलगावचे तहसीलदार संतोष रुईकर यांच्याकडे तातडीने एनडीआरएफची तुकडीसह एक टीम व ॲम्बुलन्स घटनास्थळी पाठवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जोपर्यंत पुलावर पाणी आहे तोपर्यंत गावाजवळ एनडीआरएफची टीम व ॲम्बुलन्स उपलब्ध करावी यावर ग्रामस्थ आग्रही आहेत.

“जर एखादी जीवितहानी झाली, तर त्याची जबाबदारी राहील,” असा इशारा माजलगाव तालुका चिटणीस शेकापचे भाई मुंजा पांचाळ यांनी दिला आहे.

दरम्यान, गावकऱ्यांच्या या समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करणे गरजेचे असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now