सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी मठात शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ

Spread the love

यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

Verification: 1fe30fb203b45d5d

माजलगाव (प्रतिनिधी )ऐतिहासिक परंपरा असलेल्या सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी मठ संस्थान येथे शारदीय नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि.२२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत चालणार्‍या नवरात्रोत्सवाची सांगता दि.२ ऑक्टोबर रोजी रजत पालखी सोहळा आणि दसरा दरबाराने होणार असल्याची माहिती संस्थान मठातर्फे देण्यात आली आहे.

Amazon

Amazon App Player

Download Now

सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी संस्थान मठामध्ये साजरा होणारा हा शारदीय नवरात्र महोत्सव सोहळा भक्तांना साजरा करावा असे मार्गदर्शन माजलगाव मठाचे मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी केले आहे. शारदीय नवरात्र महोत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. रविवार, दि.२८ सप्टेंबर ते गुरूवार, दिनांक २ ऑक्टोबरपर्यंत श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांचे नवरात्र तपोनुष्ठान होणार असून प्रतिनित्य श्रीगुरूंची महापूजा, प्रसाद, दुपारी ४ ते ६ या वेळात शिवपाठ व भजन, श्रीगुरूंचे आशीर्वचन आणि शिवजागर असे कार्यक्रम होणार आहेत.

सोमवार, दिनांक २२ सप्टेंबर रोजी अग्रोदक गंगापूजन कुंभोत्सव व जगन्माता अष्टभूजा मुर्तीस सिंदफणा नदीचे पाणी कलशात आणून श्रींच्या मूर्तीचा रूद्राभिषेक करून घटस्थापना करण्यात आली. तसेच दररोज सकाळी ८ वाजता, सायंकाळी ८ वाजता मंगल आरती विविध दाम्पत्यांच्या हस्ते श्रींची आरती होते. याप्रसंगी भक्तगणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग नोंदविला मिरवणुकीत गाय आणि अश्वाची मिरवणूक काढण्यात आली. देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. याप्रसंगी विश्वनाथ शेटे यांनी सपत्नीक देवीची पूजा व आरती केली. गुरूवार, दिनांक २ ऑक्टोबर रोजी मठाच्या परंपरेनुसार दसरा दरबार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. बुधवार, दिनांक १ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता श्री.शि.भ.प. नागेश महाराज विभूते दमईवाडीकर यांचे किर्तन होणार आहे. याचा सर्व भाविकभक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री संस्थान मठ माजलगाव तर्फे करण्यात आले आहे.

विजयादशमी गुरूवार, दिनांक २ ऑक्टोबर रोजी ८ ते १० श्री सद्गुरू मिस्कीन स्वामी संजीवन समाधी व लिंगैक्य तपोरत्नं प्रभु पंडिताराध्य शिवाचार्य महाराज यांचे समाधीस रूद्राभिषेक पुजा १० ते १ श्री गुरूंची महापूजा, दुपारी महाप्रसादानंतर सायंकाळी ६:३० वाजता श्रीगुरूंची रजत पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. रात्री ८ वाजता दसरा दरबात धर्मसभा होणार असून श्रीगुरूंच्या आशीर्वचनाने या शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगता होणार आहे. या दसरा महोत्सवास माजलगावसह बीड, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, धुळे, चाळीसगाव, गेवराई, साखरा, बहाद्दरपुरा, पेठशिवणी, इसाद, पिंगळी, लवुळ, कवडगाव, न्यायडोंगरी, मंगरूळ, दिंद्रुड, बोरगाव, धनेगाव, नायगाव, केसापुरी, नरवाळ, बोरविहीर, राहटी आदी भागातून शेकडो भाविकांनी हजेरी लावतात. सर्व भक्तांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन शारदीय वीरशैव तरूण नवरात्रोत्सव समिती संस्थान मठ, माजलगावच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now