गोदावरी व सिंधफाना,कुंडलीका नदीकाठच्या पुराने बाधीत झालेलं क्षेत्र कायमस्वरुपी शासनाने संपादित करावे – भाई थावरे

Spread the love

शासनाने ओला दुष्काळ जाहिर करावा

शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हाजार नुकसान भरपाई देण्यात

माजलगाव :

माजलगाव विधानसभा मतदारसंघातील गोदावरी,सिंधफाना व कुंडलीका नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी घुसुन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने शासनाने नदीकाठच्या बाधीत होणारे क्षेत्र कायमस्वरुपी संपादीत करण्यात यावे,बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा,बाधीत शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हाजार रुपायांची मदत जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने दि ०७ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचे भाई गंगाभिषण थावरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

यासंदर्भात भाई गंगाभिषण थावरे यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयात दि २५ सप्टेंबर गुरुवार रोजी दुपारी १:०० वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की,बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे,गोदावरी,सिंधफाना,कुंडलीका नदीपाकाठच्या गावात पुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसून पिकांचे मोठे प्रमाणावर नुकसान झाल्याने,शासनाने नदीकाठचे होणारे बाधित क्षेत्र कायमस्वरुपी संपादीत करुन, संबंधित शेतकऱ्यांना मावेजा देण्यात यावा, शासनाने बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा,या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने दि ०७ ऑक्टोबर मंगळवार रोजी शेतकऱ्यांचा माजलगाव तहसील कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे,तरी या आक्रोश मोर्चात बाधित शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाई गंगाभिषण थावरे यांनी पत्रकार परिषदेत केलें आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now