बीड :
माजलगाव धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढतच चाललेली असल्यामुळे धरम प्रशासनाने पाण्याचा विसर्ग हा वाढवण्यात आलेला आहे त्यामुळेच सिंदफणा नदीच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे . या वाढत्या पाणलोटामुळे सिंदफणा नदीवरील जुन्या पुलावरून पाणी वाहू लागले आहे, प्रशासनाने नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
सद्यस्थितीमध्ये धरणातून सकाळपासून सतत विसर्ग सुरू असून, नदीकाठावरील गावांमध्ये नागरिकांनी अनावश्यक हालचाली असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. जुन्या पुलावरून नदीचे पाणी वाहत असल्यामुळे या पुलावर वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे पोलिस आणि महसूल प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
दरम्यान, पावसामुळे धरणक्षेत्रात पाणी साठा वेगाने वाढत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आवश्यक तो विसर्ग सुरू ठेवला जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावं आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात, असं आवाहन प्रशासनाने केलेले आहे
स्थानिकांनाही धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आहे. दरवर्षी पावसाळ्यात असा प्रकार घडत असला तरी पुलावरून वाहणारे पाणी पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांची प्रचंड गर्दी होत आहे. मात्र, या वेळी सुरक्षित अंतर ठेवण्याच्या प्रशासनाने सूचना केलेल्या आहेत