Majalgaon Dam : माजलगाव धरणातून 88,594.77 क्युसेक पाण्याचा विसर्ग ; सिंधफणा-गोदावरी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

माजलगाव धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील जलसाठा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे धरण प्रशासनाने गुरुवार, दि. 22 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 12 वाजता धरणाच्या सांडव्यावरील गेट क्रमांक 11, 6, 16,10 व 12 हे एकूण 5 गेट 0.50 मीटरने उघडण्याचा निर्णय घेतला.

Amazon

Amazon App Player

Download Now

सद्यस्थितीत धरणातील एकूण
माजलगाव धरणाच्या सांडव्याद्वारे पाच वक्रद्वार व 11 6 16 10 व 12 हे 2.50 मीटर व सहा वक्रद्वार क्रमांक 9 13 8 14 7 व 15 हे दोन मीटरने चालू धरणातून निसर्ग सुरू आहे त्यातून तब्बल 88, 594.77 क्युसेक (2508.701 क्युमेक्स) इतके पाणी विसर्ग होत आहे. यामुळे सिंधफणा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जात असून, पाण्याची पातळी वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

माजलगाव प्रकल्प पूरनियंत्रण कक्षाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू असून, परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील काही तासांत विसर्ग वाढवावा किंवा कमी करावा लागणार आहे. त्यामुळे प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

धरणातून वाढलेला विसर्ग थेट सिंधफणा व गोदावरी नदीकाठावरील गावांमध्ये पाण्याचा धोका निर्माण करू शकतो. नदीपात्रालगतची शेती, घरं व पूरप्रवण भागातील लोकांनी सतर्क राहावे, अनावश्यक हालचाल टाळावी आणि सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसांत माजलगाव प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग वाढतो. परंतु, या वर्षी पावसाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा जास्त असल्याने पाण्याचा जोरही वाढला आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांना विशेष खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

पूरनियंत्रण कक्ष व स्थानिक प्रशासन यांच्यात समन्वय ठेवून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी मदत व बचाव पथक सज्ज ठेवण्यात आले असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवर भर द्यावा, असेही प्रशासनाचे आवाहन आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now