माजलगाव धरण क्षेत्रामध्ये सध्या पडत असलेल्या पावसामुळे व धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने —
आज दि. 22/09/2025 रोजी धरण प्रशासनाने सकाळी 08:30 वाजता
माजलगाव धरणाचे वक्रद्वार क्र. 11, 6, 16, 10, 12, 9, 13, 8, 14, 7 व 15 हे 11 गेट प्रत्येकी 0.50 मीटरने वाढविण्यात आलेले आहेत
माजलगाव धरणाच्या क्षेत्रामध्ये सतत पडत असलेल्या पावसामुळे सध्या सांडव्यावरील हेच 11 वक्रद्वार सध्या 1.50 मीटरने उघडे असून त्याद्वारे सिंधफणा नदीपात्रात 62,304.34 क्युसेक (1764.24 क्युमेक्स) इतका विसर्ग करण्यात येत आहे.धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकेनुसार विसर्ग वाढविणे / कमी करणे बाबत पुढील निर्णय घेतला जाऊ शकतो
त्यामुळे सिंधफणा व गोदावरी नदी काठावर राहत असलेल्या गावांना तसेच पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी व सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे असे आवाहन करण्यात आले आहे
Majalgaon Dam : माजलगाव धरणा मधून 62,304.34 क्युसेक पाण्याचा विसर्ग
Verification: 1fe30fb203b45d5d