माजलगाव :
सरकारने धनगर जमातीला सन २०१४ साली बारामती याठिकाणी दिलेला शब्द पाळून धनगर जमातीच्या घटनादत्त एस टी आरक्षणाची तात्काळ अमलबजावणी
करावी आणि जालना येथे दिपक बोऱ्हाडे
यांचे आमरण उपोषण तात्काळ सोडवावे या मागणीसाठी शनिवार दि.20 रोजी सकाळी 11 वाजता माजलगाव तहसीलसमोर सकल धनगर समाजाच्या वतीने निदर्शने करण्यात आली.यावेळी संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन दिले.

- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाज एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी सरकारकडे करत आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
परंतु सरकार अनेक वर्षापासून धनगर समाजाच्या तोंडास पाणी पुसण्याचे काम करत आहे.धनगर समाजास निवडणुका दरम्यान फक्त भूलथापा दिल्या जात आहेत.धनगर समाजास पोषक असणारी एसटी आरक्षण अंमलबजावणी झाल्यास धनगर समाजाच्या अनेक प्रश्न सुटण्यास गती येणार आहे.त्यामुळे सरकारने या अंलबजावणीचा गांभीर्यपूर्वक विचार करावा.असे न झाल्यास सरकार विरोधात धनगर समाजास रस्त्यावर उतरावे लागेल. व लोकशाही मार्गाने हा लढा तीव्र करावा लागेल.याची सरकारने दखल घ्यावी असा इशारा देत निवेदनकर्त्यांनी सरकारविरोधी आपल्या भावना व्यक्त केल्या.यावेळी मागण्यांचे निवेदन तहसीलदार संतोष रुईकर यांना देण्यात आले.दरम्यान समाज बांधवांची यावेळी मोठी उपस्थिती होती.