माजलगाव :
माजलगाव धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील जलसाठा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे धरण प्रशासनाने गुरुवार, दि. 18 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजता धरणाच्या सांडव्यावरील गेट क्रमांक 8, 14, 7 व 15 प्रत्येकी 0.50 मीटरने उघडण्याचा निर्णय घेतला.

- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
सद्यस्थितीत धरणातील एकूण 11 वक्रद्वार — गेट क्रमांक 11, 6, 16, 10, 12, 9, 13, 8, 14, 7 व 15 — हे प्रत्येकी 1.00 मीटर उघडे ठेवण्यात आले असून, त्यातून तब्बल 42,630.15 क्युसेक (1207.14 क्युमेक्स) इतका पाणी विसर्ग होत आहे. यामुळे सिंधफणा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जात असून, पाण्याची पातळी वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
माजलगाव प्रकल्प पूरनियंत्रण कक्षाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू असून, परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील काही तासांत विसर्ग वाढवावा किंवा कमी करावा लागणार आहे. त्यामुळे प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
धरणातून वाढलेला विसर्ग थेट सिंधफणा व गोदावरी नदीकाठावरील गावांमध्ये पाण्याचा धोका निर्माण करू शकतो. नदीपात्रालगतची शेती, घरं व पूरप्रवण भागातील लोकांनी सतर्क राहावे, अनावश्यक हालचाल टाळावी आणि सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसांत माजलगाव प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग वाढतो. परंतु, या वर्षी पावसाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा जास्त असल्याने पाण्याचा जोरही वाढला आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांना विशेष खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
पूरनियंत्रण कक्ष व स्थानिक प्रशासन यांच्यात समन्वय ठेवून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी मदत व बचाव पथक सज्ज ठेवण्यात आले असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवर भर द्यावा, असेही प्रशासनाचे आवाहन आहे.