मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आणि आय-बाईकचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

परभणी :

Amazon

Amazon App Player

Download Now

परभणी पोलीस विभागाच्या तपास प्रक्रियेला गती मिळावी आणि अत्याधुनिक साधनांचा वापर करून कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट व्हावी, यासाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आणि आय-बाईकची आजपासून जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेत भर पडली आहे. या साधनांचा शुभारंभ आज (दि. १७) पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आला.

या प्रसंगी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या, “परभणी पोलीस विभागाचे आय-बाईकसारखे नाविन्यपूर्ण उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहेत. ‘टाकाऊ पासून टिकाऊ’ या संकल्पनेतून या बाईक तयार झाल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या साधनांचा मोठा उपयोग होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमात हा उपक्रम नाविन्यपूर्ण उदाहरण म्हणून सादर करावा,” अशी सूचनाही त्यांनी केली.

यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या संकल्पनेचे विशेष कौतुक केले.

प्रास्ताविक करताना पोलीस अधीक्षक परदेशी म्हणाले, “जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा नेहमीच सतर्क आहे. नव्या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आणि आय-बाईकच्या मदतीने तपास प्रक्रियेला गती मिळेल. गुन्हे तपास अधिक वैज्ञानिक व परिणामकारक पद्धतीने पार पडेल.”

यानंतर पालकमंत्री बोर्डीकर यांनी आय-बाईकला हिरवी झेंडी दाखवून औपचारिक उद्घाटन केले. त्यापूर्वी फॉरेन्सिक व्हॅन व आय-बाईकचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

या उपक्रमामुळे परभणी पोलीस विभागाच्या तपास यंत्रणेत एक महत्त्वाचे पाऊल टाकले गेले असून, गुन्हे तपास अधिक वेगवान व परिणामकारक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now