नवी दिल्ली :
आयकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा देत आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत आणखी वाढवली आहे. १५ सप्टेंबर ही शेवटची तारीख ठरवण्यात आली होती; परंतु मोठ्या संख्येने करदाते शेवटच्या क्षणी रिटर्न दाखल करत असल्याने आणि आयकर पोर्टलवर सतत तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे विभागाने डेडलाईन १६ सप्टेंबर मध्यरात्रीपर्यंत वाढवली आहे.

- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
करदात्यांच्या अडचणीची दखल
गेल्या काही दिवसांपासून आयकर ई-फायलिंग पोर्टलवर सर्व्हर डाऊन होणे, लॉगिन न होणे, सबमिशन टाइमआउट अशा तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत होत्या. सीए आणि करदाते यामुळे वैतागले होते. हाच मुद्दा लक्षात घेऊन विभागाने उशिरा रात्रीच अधिकृत निवेदन जारी करून आणखी एक दिवसाची मुदतवाढ जाहीर केली.
७ कोटींहून अधिक ITR दाखल
आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १५ सप्टेंबरपर्यंत तब्बल ७.३ कोटी आयटीआर दाखल झाले आहेत. ही आकडेवारी मागील वर्षाच्या तुलनेत जास्त आहे. विभागाने करदाते आणि कर व्यावसायिकांचे आभार मानत, ज्यांनी अद्याप ITR दाखल केलेले नाही, त्यांनी शक्य तितक्या लवकर प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन केले आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
सलग दुसऱ्यांदा वाढलेली मुदत
या वर्षी आयटीआर फॉर्म उशिरा जारी झाल्यामुळे पूर्वीच ३१ जुलैची अंतिम तारीख वाढवून १५ सप्टेंबर करण्यात आली होती. मात्र, तांत्रिक त्रुटी निवारणासाठी विभागाला पुन्हा एकदा करदात्यांना अतिरिक्त वेळ द्यावा लागला. यामुळे मध्यमवर्गीय नोकरदार व लघुउद्योजकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आयटीआर भरण्याची शेवटची तारीख सलग दुसऱ्यांदा वाढवण्यात आली असली, तरीही ही अंतिम संधी मानून करदात्यांनी विलंब न लावता रिटर्न दाखल करणे आवश्यक आहे. अन्यथा उशिरा दाखल केल्यास दंड व व्याज भरण्याची वेळ येऊ शकते, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे.