दिल्लीतील एम्समध्ये घेतला अखेरचा श्वास; पुण्यात होणार अंत्यसंस्कार
देशातील कायदा क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे (वय ४९) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सोमवारी न्यायालयीन कामकाजादरम्यान त्यांना अचानक चक्कर आल्याने त्यांना तत्काळ दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच मंगळवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
त्यांच्या निधनाची बातमी कळताच कायदा, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज, १६ सप्टेंबर रोजी दुपारी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शिंदे घराण्याची परंपरा
सिद्धार्थ शिंदे हे माजी केंद्रीय कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे नातू होते. बालपणापासूनच अभ्यासू वृत्ती आणि वक्तृत्वाची ताकद यामुळे त्यांच्याकडे कायदा व्यवसायाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. केवळ न्यायालयीन कारवाईपुरतेच नव्हे तर सामान्य नागरिकांशी संवाद साधण्यातही ते तितकेच कुशल होते.
कायद्याचे सोपे भाष्यकार
सुप्रीम कोर्टातील महत्त्वाच्या खटल्यांत त्यांनी आपला ठसा उमटवला. मराठा आरक्षण प्रकरण, राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावण्या आणि इतर गुंतागुंतीच्या खटल्यांमध्ये त्यांच्या युक्तिवादाने केवळ न्यायालयच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले.
सामान्य माणसालाही कठीण कायदेशीर बाबी सोप्या भाषेत समजावून सांगण्याची त्यांची खासियत होती. त्यामुळे ते अनेक प्रसारमाध्यमांमध्ये तज्ज्ञ म्हणून चर्चेत राहिले.
कायदा क्षेत्राची मोठी हानी
कायद्याचा गहन अभ्यास, प्रखर युक्तिवादाची शैली आणि जनतेशी साधलेला जवळचा संवाद – या सर्व गुणांमुळे सिद्धार्थ शिंदे यांनी महाराष्ट्रात आणि देशभरात वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांचे अकाली जाणे हे विधी क्षेत्रासाठी अपूरणीय नुकसान असल्याचे मत न्यायालयीन वर्तुळातून व्यक्त होत आहे.
सिद्धार्थ शिंदे यांच्या निधनाने न्यायालयीन जगतातील एक अभ्यासू, तल्लख आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्व हरपल्याची भावना सर्वत्र उमटत आहे.